There will be a Maratha reservation in government job recruitment says Chief Minister
There will be a Maratha reservation in government job recruitment says Chief Minister  
महाराष्ट्र

सरकारी नोकरभरतीत मराठा आरक्षण : मुख्यमंत्री

सकाळवृत्तसेवा

नागपुर : शासकीय नोकऱ्यांसाठी घोषित करण्यात आलेल्या राज्य सरकारच्या महाभरतीमध्ये सोळा टक्के जागा मराठा समाजासाठी राखीव ठेवण्यात येतील. न्यायालयाचा आरक्षणासंदर्भात  निर्णय आल्यानंतर या जागा अनुशेष म्हणून भरण्यात येतील अशी महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत केली.

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठा आरक्षणावरुन गोंधळ सुरु असताना मुख्यमंत्र्यांनी आरक्षणची दिशा स्पष्ट केली. बीड जिल्ह्यात परळी येथे आरक्षणासाठी मराठा समाजाने पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे विनायक मेटे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. तसेच या महाभरतीमध्ये मराठा समाजासाठी जागा आरक्षित ठेवण्याची मागणी केली, याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले, की दोन वर्षांत एकूण 72 हजार जागांसाठी ही भरती असून पहिल्या 36 हजार जागा भरण्यात येतील. न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर मराठा समाजाच्या 16 टक्केच्या प्रमाणात बॅकलॉग म्हणून अणखी भरती करण्यात येईल. दुसऱ्या वर्षी याच फॉर्म्युल्यानुसार आरक्षण देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

त्याचप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार भक्कमपणे न्यायालयात आपली बाजू मांडत आहे. न्यायालयाने आदेश दिल्याप्रमाणे मागासवर्गीय आयोगाच्या शिफारसीशिवाय हे आरक्षण देता येणार नाही  यासाठी नेमण्यात आलेल्या मागासवर्गीय आयोगाचा अहवाल  लवकरात लवकर न्यायालयात सादर करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मराठा आरक्षणाचा विषय हा आता राज्य सरकारच्या अखत्यारीत नाही तो न्यायप्रविष्ट आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Pune Visit : सुरेश कलमाडींनी पुण्यात पंतप्रधानांना चप्पल फेकून मारली अन्...

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

SCROLL FOR NEXT