कांदा

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

पहिल्यांदाच असे झाले! सोलापूर बाजार समितीत स्थानिक नव्हे परजिल्ह्यातील कांदा; नवा कांदा प्रतिक्विंटल 1200 रुपये तर जुन्या कांद्याला 2500 रुपयांपर्यंतच भाव

ऑक्टोबर-नोव्हेंबर व डिसेंबर या तीन महिन्यात जिल्ह्यातील कांदा मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी बाजार समितीत येतो. जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत स्थानिक कांद्याची आवक खूप असते. यंदा मात्र सप्टेंबरमधील अतिवृष्टी व पुरामुळे कांद्याचे नुकसान झाले.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा अजूनही स्थानिक शेतकऱ्यांचा कांदा अपेक्षेप्रमाणे विक्रीसाठी आलेला नाही. शुक्रवारी (ता. २४) सोलापूर बाजार समितीत ७५ गाड्या कांदा आला होता. दिवाळी सुट्ट्यांमुळे आवक कमीच होती, तरीदेखील भाव समाधानकारक नव्हता. शुक्रवारी प्रतिकिलो एक ते २५ रुपये दर मिळाला.

सोलापूर जिल्ह्यात ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांत दरवर्षी ३८ ते ४० हजार हेक्टरवर कांदा लागवड होते. ऑक्टोबर-नोव्हेंबर व डिसेंबर या तीन महिन्यात जिल्ह्यातील कांदा मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी बाजार समितीत येतो. जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत स्थानिक कांद्याची आवक खूप असते. यंदा मात्र सप्टेंबरमधील अतिवृष्टी व पुरामुळे कांद्याचे नुकसान झाले. दुसरीकडे सलग २० ते २५ दिवस कांद्यात पाऊस साचून राहिल्याने वाढ खुंटली. त्यामुळे यंदा सोलापूर जिल्ह्यातील कांदा डिसेंबरअखेर बाजारात येईल, अशी स्थिती आहे.

पण, दरवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हिवाळ्यात स्थानिक कांद्याची आवक खूपच कमी असणार आहे. दिवाळी सुट्ट्यांपूर्वी सोलापूर बाजार समितीत २०० ते २४० गाड्या कांदा येत होता. त्यात जिल्ह्यातील स्थानिक शेतकऱ्यांचा कांदा १० टक्के सुद्धा नव्हता, असे बाजार समितीतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

कांद्याचे प्रतिक्विंटल दर...

  • जुना लाल कांदा

  • १५०० ते २५०० रुपये

  • नवीन वाळलेला कांदा

  • ५०० ते १२०० रुपये

  • पांढरा कांदा

  • १५०० ते ३१०० रुपये

बाजार समितीत ‘येथून’ येतोय कांदा

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या सरासरी २०० गाड्या कांदा आवक आहे. कर्नाटक, म्हसवड, माण, खटाव, दौंड, अहिल्यानगर, पुणे व नाशिक जिल्ह्यातून सोलापूर बाजार समितीत कांदा येत आहे. दरवर्षी ऑक्टोबर ते जानेवारीपर्यंत सोलापूर बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या कांद्यात ४० ते ५० टक्के कांदा स्थानिक असतो. पण, यंदा तसे प्रमाण नसल्याचे बाजार समितीतील अधिकारी सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic Jam Update : झाली दिवाळी! परतीच्या प्रवासातही वाहतूक कोंडी, मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा....

Satara Doctor Case : साताऱ्यात महिला डॉक्टरने शारीरिक अत्याचाराला कंटाळून जीव दिला! तिच्यावर दबाव टाकणारा 'तो' खासदार कोण?

AUS vs IND: विराट -रोहितची फक्त फलंदाजीमध्येच नाही, तर फिल्डिंगमध्येही हवा; २-२ कॅच घेत केले मोठे विक्रम

Pune News : केंद्रीय मंत्री मोहोळ यांची जैन बोर्डिंगला भेट; जैन मुनींपुढे नतमस्तक

कसं गणित जुळवायचं? १० एकरात फक्त १२ क्विंटल सोयाबीन, नापिकी अन् कर्जबाजरीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपवलं जीवन

SCROLL FOR NEXT