Chandrakant Patil news in Marathi  
महाराष्ट्र बातम्या

...हा तर बाबासाहेबांचा अपमान; शाईफेकीच्या घटनेनंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

पुणे - राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकून हल्ला करण्यात आला आहे. चिंचवड गावांमध्ये चंद्रकांत पाटील हे एका कार्यकर्त्याच्या घरी आले असता त्यांच्यावर हा शाई फेकून हल्ला करण्यात आला आहे. या घटनेनंतर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया आली आहे. (Chandrakant Patil news in Marathi)

चंद्रकांत पाटील म्हणाले की, मी कार्यक्रमाला चाललो आहे. मी चळवळीतला माणूस आहे. आपण कुणालाही घाबरत नाही. मी दिलगीरी व्यक्त केल्यानंतरही हा हल्ला झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमाला धक्का लावत आहे. विरोध लोकशाही मार्गाने करायचा. सध्या झुंडशाही चालू आहे. ही झुंडशाही चालणार नाही. शब्दाला शब्दाने टक्कर द्यायला हवी, असही ते म्हणाले.

पाटील पुढं म्हणाले की, गिरणी कामगाराचा पोरगा या स्टेजपर्यंत आला हे झेपत नसल्याने सरंजामशाहीकडून हल्ले होत आहे. हे चुकीचे पायंडे पडले आहेत. या प्रकरणात पोलिसांना दोष देण्याचा कारण नाही. कार्यकर्ते आले आहेत. पोलिसांना कस कळेल की, कोणता कार्यकर्ता आहे आणि कोण बदमाश आहे.

दरम्यान ही लोकशाही नाही, झुंडशाही आहे. हा बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे. मी पैठणला बोललो त्याचा विपर्यास झाला. छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर १०० मार्कांचा अभ्यासक्रम सुरु करायला हवा, असंही पैठणच्या कार्यक्रमात म्हणालो होतो. मात्र मीडियाने हे दाखवलं नाही, याची खंतही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT