new year party esakal
महाराष्ट्र बातम्या

नववर्षाच्या पार्टीसाठी ‘हा’ परवाना बंधनकारक! राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दाखल होणार गुन्हे; हॉटेल, ढाब्यांवर मद्यपान नकोच

ज्या हॉटेल चालकांना नववर्षानिमित्त पार्टी आयोजित करायची आहे, त्यांनी मद्य वितरणाचा एकदिवसाचा परवाना घ्यावा, अन्यथा कारवाई होऊ शकते, असा इशारा अधीक्षक नितिन धार्मिक यांनी दिला आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने सहा पथके नेमली आहेत. अवैध मद्य वाहतूक आणि ढाबा व हॉटेलवरील अवैध मद्यविक्री, यावर या पथकांचा वॉच असणार आहे. ज्या हॉटेल चालकांना नववर्षानिमित्त पार्टी आयोजित करायची आहे, त्यांनी मद्य वितरणाचा एकदिवसाचा परवाना घ्यावा, अन्यथा कारवाई होऊ शकते, असा इशारा अधीक्षक नितिन धार्मिक यांनी दिला आहे.

सोमवारी (ता. १८) सकाळच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने माढा-कुर्डुवाडी रोडवरील रणदिवेवाडी येथील हॉटेल सह्याद्री येथे छापा टाकला. त्यावेळी ढाबा चालक प्रमोद रणदिवे ग्राहकांना मद्यपानाची व्यवस्था करुन देत असल्याचे आढळले. त्यामुळे चालकासह दोन मद्यपींना अटक झाली. त्यांच्या ताब्यातून ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. गुन्ह्यातील तपास अधिकारी विनायक जगताप यांनी तपास पूर्ण करून माढा न्यायालयात आरोपपत्र सादर केले. त्यावेळी न्यायदंडाधिकारी वाय.एस. आखरे यांनी हॉटेल चालकास २५ हजार रूपये आणि दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिन्याची साधी कैदेची शिक्षा सुनावली.

तसेच दोन्ही मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी पाचशे रुपये दंड आणि दंडाची रक्कम न भरल्यास सात दिवसांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक व उपअधीक्षक गुणाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक किरण बिरादार, दुय्यम निरीक्षक विनायक जगताप, सहायक दुय्यम निरीक्षक जीवन मुंढे, जवान विकास वडमिले, विजयकुमार शेळके व वाहनचालक रामचंद्र मदने यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.

परवाना बंधनकारक, अन्यथा गुन्हा दाखल होईल

ढाब्यावर दारु विकणे व त्याठिकाणी बसून मद्यापन करणे हा गुन्हाच आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध गुन्हे दाखल होवू शकतात. महामार्गांवरील ढाबे, हॉटेल अशा ठिकाणी आमच्या विभागाच्या पथकांकडून धाडी टाकून कारवाई केली जात आहे. तसेच परराज्यातून येणाऱ्या अवैध दारू वाहतुकीवरही लक्ष ठेवले जात आहे.

- नितीन धार्मिक, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

SCROLL FOR NEXT