cm eknath shinde on uddhav thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray: "हा निकाल अंतिम नाही"; उद्धव ठाकरेंनी दिले पुढच्या कार्यवाहीचे संकेत

शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज निकाल दिला.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज निकाल दिला. या निकालावर उद्धव ठाकरेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा निकाल अंतिम नाही, अशा शब्दांत त्यांनी सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे संकेत दिले. तसेच नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अवमान केल्याचंही ठाकरेंनी म्हटलं आहे. (This verdict is not final Uddhav Thackeray gave an indication of the next course of action on ShivSena MLA disqualification result)

पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ज्या पद्धतीनं लवाद म्हणून नार्वेकरांना बसवलं होतं त्यावरुन त्यांच्या वागणुकीतून हे स्पष्टपणे दिसत होतं की, यांची मिलीभगत आहे. आजच्या निकालामुळं एक गोष्ट प्रश्नांकित झालेली आहे की पक्षांतर बंदी कायदा अधिक मजबूत करण्याऐवजी पक्षांतर कसं करावं आणि त्याचा राजमार्ग कसा असेल हे त्यांनी सांगितलं.

आजपर्यंत आपण असं मानत आलो की, भारताच्या घटनेनुसार सुप्रीम कोर्टाचे निर्णय हे सुप्रीम असतात. पण नार्वेकरांनी आज जो काही निकाल दिला त्यातून त्यांनी सुप्रीम कोर्टाचे निर्देश पायदळी तुडवले आहेत. आमच्या मागं महाशक्ती आहे आम्ही सुप्रीम कोर्टाला सुद्धा जुमानत नाही हे त्यांच्या निकालातून दिसून आलेलं आहे.

मूळ केस अपात्रतेची होती पण त्यांनी अपात्र कोणालाच ठरवलेलं नाही. मग शिवसेनेची घटना तुम्ही ग्राह्य धऱत नसाल तर मग आम्हाला अपात्र का केलं नाही? असा सवालही त्यांनी केला. त्याही पलिकडे जाऊन शिवसेना कोणाची यावर त्यांनी निकाल दिला. जो निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा आहे, ज्याला सुप्रीम कोर्टात आम्ही आव्हान दिलं आहे, तोच त्यांनी पाया मानला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अवमान करत नार्वेकरांनी प्रिव्हिलेजचा गैरफायदा घेतला आहे. जर ही याचिका दाखल करता येणार नसेल तर सुप्रीम कोर्ट याबाबत सुओमोटो दाखल करुन घेते का? हे पहावं लागेल, असंही ते म्हणाले.

2018 ला माझी नियुक्ती सुप्रीम कोर्टानं मानली आहे. त्यामुळं मला अधिकारच नसल्याचं सांगण्याचा नार्वेकरांनाच अधिकार नाही. कोर्टानं आमचा व्हिप, गटनेता मानला होता. २०१८ सालची आमची घटना यांना मान्य नाही तर मग हे कशाच्या आधारे निवडून आले होते. त्यांना सुप्रीम कोर्टानं जे सांगितलं होतं ते सोडून नको त्यात घुसून त्यांनी वेळकाढूपणा केला. हाच निर्णय ते पहिल्या दिवशी देऊ शकत होते. आम्ही आता सुप्रीम कोर्टात जाणारच आहोत. कोर्टाला विनंती आहे की निवडणुकीच्या आधी दूध का दूध पाणी का पाणी हे व्हायला पाहिजे. कारण यांना निवडणूक काढायची आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT