महाराष्ट्र बातम्या

राज्यात कोरोनाच्या तीन हजार रुग्णांची भर ; अतिजोखमीचे आजार असलेल्यांचे मृत्यूचे प्रमाण जास्त 

सकाळवृत्तसेवा

पुणे - राज्यात कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेले तीन हजार सात नवीन रुग्णांचे निदान झाले. त्यामुळे कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येने 86 हजारांचा आकडा गाठला आहे. राज्यात 91 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृतांचा आकडा तीन हजार 60 झाला आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य खात्याने रविवारी दिली. 

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 64 पुरुष तर 27 महिला आहेत. मृत्यू झालेल्या 91 पैकी 46 रुग्ण 60 वर्षे किंवा त्यावरील आहेत तर 41 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. चार जण 40 वर्षांखालील आहे. या 91 रुग्णांपैकी 67 जणांमध्ये (73.6 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. "कोविड 19'मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 3060 झाली आहे. 

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी 31 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू 13 एप्रिल ते 4 जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील 60 मृत्यू झालेल्यांमध्ये मुंबई 44, उल्हासनगर 5, मीरा भाईंदर 4, सोलापूर 4, नाशिक 1, पालघर 1 व इतर राज्यातील एका रूग्णाचा समावेश आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यातील कोरोना रुग्णांची स्थिती 
दिवसभरात बरे झालेले - एक हजार 924 
आतापर्यंत बरे झालेले - 39 हजार 314 
सध्या उपचार घेणारे - 43 हजार 591 

आतापर्यंत केलेल्या तपासण्या 
- पाच लाख 51 हजार 647 नमुने 
- 85 हजार 975 नमुने पॉझिटिव्ह 

क्‍लस्टर कंटेन्मेंट कृतियोजना 
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्‍लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्‍लस्टर कंटेन्मेंट कृतियोजना अमलात आणण्यात येत आहे. राज्यात तीन हजार 654 कंटेन्मेंट झोन क्रियाशील आहेत. आज 18 हजार 515 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी 69 लाख 60 हजार लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

Degloor News : जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी देगलूरात भाजपची चाचपणी; आमदार अमर राजूरकरांचा दौरा

Latest Marathi News Live Update : राम मंदिर देणगीतील अफरातफरीच्या प्रकरणात दोन गुजराती लोक विक्री करण्यात मग्न - काँग्रेस नेते परगट सिंग

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २७ जून २०२६ ते ३ जुलै २०२६ - मराठी राशी भविष्य

निवडणुकीतील पराभवानंतर विरोधकांमध्ये फूट! मोठ्या पक्षाने ९ वर्षांची साथ सोडत युती तोडली; राजकीय गणित बिघडले

SCROLL FOR NEXT