corona deathupdate sakal
महाराष्ट्र बातम्या

Corona Death: लस न घेतल्याने राज्यात अधिक मृत्यू

कोविड प्रतिबंधात्मक लस न घेतल्याने जीवाला धोका निर्माण होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगितले जाते.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोविड प्रतिबंधात्मक लस न घेतल्याने जीवाला धोका निर्माण होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगितले जाते. मात्र आजही अनेक जण लस घेण्यास पुढाकार घेत नाहीत. कोविड प्रतिबंधात्मक लस घेतल्याने राज्यात सर्वाधिक मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून पुढे आले आहे. दरम्यान, लस घेतलेल्यांमध्ये संसर्ग आणि मृत्यूचे प्रमाण अत्यल्प असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

राज्य आरोग्य विभागाने तिसऱ्या लाटेदरम्यान आठ हजार २६६ कोविड रुग्णांचा अभ्यास केला. त्यापैकी लसीकरण झालेल्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण केवळ ०.६६ टक्के होते, तर लसीकरण न झालेल्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण तिप्पट म्हणजेच २.१ टक्के होते. लसवंतांमध्ये ब्रेक थ्रू संसर्गाचे प्रमाण अधिक असले, तरी लसीकरण न केलेल्या व्यक्तींपेक्षा संसर्गाची तीव्रता मात्र कमी होती.
३६ जिल्ह्यांत केलेल्या सर्वेक्षणात आठ हजार २६६ रुग्णांपैकी ९४३ रुग्णांचा एकच, चार हजार ३५९ जणांचे दोन्ही, तर उर्वरित दोन हजार ९६४ जणांचा एकही डोस झाला नव्हता. त्यापैकी एक डोस घेणाऱ्यांपैकी केवळ ३५ रुग्णांचा (०.६६ टक्के) मृत्यू झाला. दुसरीकडे लसीकरण न झालेल्या रुग्णांमध्ये मृत्युदर २.१ टक्के होता. दरम्यान, लस घेतल्यानंतरही संसर्ग होण्याचे प्रमाण तरुणांमध्ये अधिक आहे. कारण शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने बाहेर पडणाऱ्यांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक असल्याचे कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी म्हणाले.

प्रत्येक व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती एकसारखी नसते. काही कारणाने लशीचा प्रभाव कमी झाल्याने संसर्ग होण्याची शक्यता असते. सुदैवाची बाब म्हणजे त्यांच्यामध्ये संसर्गाची तीव्रता अधिक नव्हती.
- डॉ. प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी

कोरोना प्रतिबंधात्मक लशी १०० टक्के संरक्षण देत नाही; मात्र गंभीर धोका होण्यापासून मात्र संरक्षण देतात. तसेच लस घेतलेल्यांमध्ये रुग्णालयात दाखल होण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण कमी आहे.
- डॉ. अविनाश सुपे, प्रमुख, कोविड मृत्यू समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT