Sanjay Raut on Kirit Somaiya  e sakal
महाराष्ट्र बातम्या

स्वच्छतागृह गैरव्यवहार बाहेर काढणार

संजय राऊत यांचा सोमय्यांना इशारा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शिवसेना आणि भाजपमध्ये सुरु असलेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपात कोणीही माघार घ्यायला तयार नाही. भाजपचे नेते किरीट सोमय्या शिवसेनेला निशाण्यावर ठेवून दररोज नवीन एक आरोप करतात. त्यांचीच री ओढत शिवसेनेचे नेते खा. संजय राऊतांनी देखील भ्रष्टाचाराच्या आरोपाचे फटाके वाजवण्यास सुरुवात केली आहे. आज राऊतांनी पुन्हा एकदा लवकरच किरीट सोमय्यांचा ‘स्वच्छतागृह गैरव्यवहार’ बाहेर काढणार असल्याचे सांगत सोमय्यांना इशारा दिला आहे. लोक विक्रांतपासून स्वच्छतागृहापर्यंत पैसे खात असल्याचा टोला राऊत यांनी सोमय्यांना लगावला आहे.

राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, लवकरच मी किरीट सोमय्या या महाशयांचा एक ‘स्वच्छतागृह गैरव्यवहार’ ही बाहेर काढणार आहे. तो महाराष्ट्रात दुर्गंधी निर्माण करणारा असेल. मिरा-भाईंदर महापालिका आणि महाराष्ट्रात इतरत्र काही कोटींचा ‘स्वच्छतागृह गैरव्यवहार’ झाला आहे. याबाबतची सर्व कागदपत्रे सुपूर्द केलेली आहेत. ‘युवा प्रतिष्ठान’ नावाची जी ‘एनजीओ’ सोमय्या चालवत होते. त्यांनी शेकडो कोटी रुपयांचा ‘स्वच्छतागृह गैरव्यवहार’ केला असल्याचा दावा राऊत यांनी केला. खोटी बिले देणी, पर्यावरणाचा ऱ्हास करून पैसे काढणे हा यांचा गोरखधंदा लवकरच महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणणार असल्याचा इशाराच राऊत यांनी दिला आहे.

भाजपचे महाविकास आघाडीवर होत असलेले आरोप वैफल्यातून होत असल्याचे संजय राऊत म्हणाले. न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टीला छिद्र पडलंय का, असा सवाल उच्च न्यायालयाने भाजपचे नेते किरीट सोमय्यांना दिलेल्या अटकपूर्व जामीनावर राऊतांनी विचारला. मुंबई सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळताना विचारलेल्या प्रश्नाचे काय झाले, असाही प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.

लोकांकडून घेतलेल्या पैशाचा लोकांना हिशोब द्यावा लागतो, नाहीतर लोक विश्वास ठेवत नाहीत. आधी तुम्ही तुमचे हिशोब लोकांना द्या. ‘विक्रांत’साठी गोळा केलेल्या पैशांचे काय झाले, हे सांगा.

- संजय राऊत, खासदार,शिवसेना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT