Train Berth 
महाराष्ट्र बातम्या

Train Berth : लोअर बर्थ आता दिव्यांगांसाठी राहणार राखीव, पण...

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : रेल्वेमधील लोअर बर्थला प्रवाशांची पहिली पसंती असते. मात्र, आता स्लीपर कोचमधील लोअर बर्थ दिव्यांगांसाठी राखीव राहणार आहे. रेल्वे बोर्डाने प्रवासात दिव्यांगांचा त्रास कमी व्हावा. तसेच त्यांचा प्रवास सोईस्कररीत्या व्हावा म्हणून दिव्यांगासांसाठी खास स्लीपर कोचमधील बर्थ आरक्षित केला जाणार आहे. दिव्यांगांना यामुळे प्रवासात दिलासा मिळणार आहे.

रेल्वे प्रवासात जागा मिळावी आणि आपल्या पसंतीचा बर्थ मिळावा म्हणून बहुतांश प्रवासी आधीच तिकीट आरक्षित करून ठेवतात. सध्या उन्हाळ्याच्या हंगामात प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे. त्यामुळे वेटींगमुळे प्रवाशांचे हाल होत आहे. अशा स्थितीत दिव्यांगांना प्रवास करताना मोठी अडचण होते. प्रवासात बहुतांश गाड्यांमध्ये जागा मिळत नसल्याने दिव्यांगांचा प्रवास कठीण होतो.

ही अडचण लक्षात घेऊन रेल्वे बोर्ड दिव्यांगासाठी जागा राखीव ठेवणार आहे. रेल्वेने दिव्यांग किंवा शारीरिकदृष्ट्या अक्षम लोकांसाठी ट्रेनचा खालचा बर्थ आरक्षित केला आहे. त्यांचा प्रवास अधिक सोईस्कर करण्यासाठी भारतीय रेल्वेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वे ज्येष्ठ नागरिकांना न विचारता लोअर बर्थ देते.

स्लीपर क्लासमध्ये ६ ते ७ लोअर बर्थ, प्रत्येक तिसऱ्या एसी कोचमध्ये ४-५ लोअर बर्थ, प्रत्येक दुसऱ्या एसी कोचमध्ये ३-४ लोअर बर्थ ४५ वर्षे किंवा त्याहून अधिक आणि गर्भवती महिलांसाठी रेल्वेमध्ये आरक्षित आहेत. कोणताही पर्याय न निवडता त्यांना जागा मिळते. तर वरच्या सीटवर असलेले ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग किंवा गर्भवती महिलेला तिकीट बुकिंग दिल्यास, ऑनबोर्ड तिकीट तपासणी दरम्यान टीटीने त्यांना खालची सीट देण्याची तरतूद आहे.

अशा राहतील दिव्यांगांना राखीव जागा

स्लीपर क्लासमधील दिव्यांगांसाठी ४ जागा राखीव राहणार आहे. त्यात २ लोअर व २ मिडल बर्थ असणार आहे. तसेच थर्ड एसीमध्ये दोन जागा, एसी ३ इकॉनॉमीमध्ये दोन जागा राखीव राहणार आहेत. किंवा दिव्यांगांसोबत प्रवास करणारे लोक या सीटवर बसू शकतील. त्याचवेळी गरीब रथ रेल्वेगाडीमध्ये २ लोअर आणि २ अप्पर बर्थ दिव्यांगांसाठी राखीव राहणार आहेत. मात्र, त्यांना या जागांसाठी पूर्ण पैसेही द्यावे लागणार आहेत. दिव्यांगांच्या या निर्णया संदर्भात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे मंडल वाणिज्य प्रबंधक व जनसंपर्क अधिकारी सी.डी. पगारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

"दिव्यांगांसाठी हा निर्णय चांगला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने व्हायला हवी. बहुतांश वेळा जनरल डब्याचे प्रवासी स्लीपर कोचमध्ये बसत असल्याने आरक्षित बर्थ असलेल्यांना अडचण निर्माण होते. तसाच दिव्यांगांकरिता हा प्रकार होऊ नये."

- बसंतकुमार शुक्ला, सचिव- भारतीय यात्री केंद्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : "...तर सेवेचा राजीनामा द्या अन् संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा"; राज ठाकरेंची IPS विश्वास नांगरे पाटलांवर टीका

Malvan Swimming Pool VIDEO : काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! स्विमिंग पूलमध्ये उंचावरून मारली उडी, डोकं तळाशी जोरात आपटलं, 25 वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत

Latest Marathi News Live Update : विशाळगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात; मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

Mumbai Water Supply: मुंबईवर कपातीचे संकट! धरणांनी गाठला तळ, अत्यल्प पावसामुळे चिंता

Video Viral: जग पाहता येत नाही... पण बापाच्या शब्दांनी रोनाल्डोचा गोल अनुभवला; लेकाची रिअ‍ॅक्शन डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT