Pune Station esakal
महाराष्ट्र बातम्या

Pune Station : रेल्वेमधल्या झुरळांना प्रवाशी वैतागले; पुणे स्थानकात दीड तास ट्रेन रोखून धरली

संतोष कानडे

पुणेः पनवेलहून नांदेडकडे जाणारी प्रवाशी ट्रेन पुणे स्थानकात दीड तास प्रवाशांनी रोखून धरली. त्याचं कारण आहे झुरळं. रेल्वेच्या डब्यांमध्ये एवढी झुरळं आहेत की प्रवाशी अक्षरशः वैतागले आहेत.

त्याचं झालं असं की, पनवेल-नांदेड ट्रेन पनवेलहून निघाली खरी परंतु पुण्यातच अडकून पडली. पनवेल ते पुणे प्रवासादरम्यान रेल्वेच्या डब्यात झुरळांनी एवढा उच्छाद मांडला की डब्यात थांबणंही प्रवशांना शक्य नव्हतं.

जेव्हा पनवेल-नांदेड ही ट्रेन पुणे स्थानकात दाखल झाली तेव्हा प्रवाशांनी रेल्वे रोखून धरली. झुरळांचा बंदोबस्त केल्याशिवाय ट्रेन पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका प्रवाशांनी घेतली. त्यामुळे रेल्वे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती.

दीड ते दोन तास पुणे स्थानकामध्ये रेल्वे रोखून धरण्यात आलेली होती. रेल्वे प्रशासन प्रवाशांची मनधरणी करण्यात गुंतलं आहे. मात्र झुरळांचं बंदोबस्त कुणी करत नाहीये. साध्या ट्रेनकडे रेल्वेचं किती दुर्लक्ष आहे, हे दिसून येतंय.

पंतप्रधानांकडून देशामध्ये वंदे भारत एक्स्प्रेसला एकामागून एक हिरवा झेंडा दाखवला जातोय. परंतु साध्या प्रवाशी रेल्वेगाड्यांकडे कुणाचंही लक्ष नाही. रेल्वेत झुरळांची संख्या एवढी लक्षणीय असेल तर स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी कुणाची? असा प्रश्न उपस्थित होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Himachal Cloudburst Rescue : हिमाचल प्रदेशात ढगफुटी; पूल वाहून गेल्याने ४१३ यात्रेकरूंची 'Zipline'द्वारे सुटका, पुरात आणखी कितीजण अडकले?

Pigeon Droppings & Allergies: फक्त शिंका नाहीत... कबुतरांच्या विष्ठेमुळे होतात अनेक अ‍ॅलर्जी व विकार! कशी घ्यावी काळजी

Latest Marathi News Updates Live : कबुतरखाना बंद करण्यापूर्वी विचार करायला हवा होता- रोहित पवार

Automatic Car Pros And Cons: ऑटोमॅटिक कार खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या फायदे अन् तोटे

पुण्यातील २४ जणं उत्तराखंडमध्ये बेपत्ता; १९९०च्या १०वीच्या बॅचमधील मित्र-मैत्रीण बऱ्याच वर्षांनी एकत्र भेटले अन्...

SCROLL FOR NEXT