Nashik Police transfers sakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील ६ ‘पीआय, एपीआय’च्या बदल्या! मोहोळ, मंद्रूप, कामती, वेळापूर, माढा, नातेपुते पोलिस ठाण्यांचे आता ‘हे’ प्रभारी, वाचा...

पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सात पोलिस अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय सोयीसाठी बदल्या केल्या आहेत. त्यात मोहोळ, मंद्रूप, कामती, वेळापूर, माढा, नातेपुते पोलिस ठाण्यांचा समावेश आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सात पोलिस अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय सोयीसाठी बदल्या केल्या आहेत. त्यात मोहोळ, मंद्रूप, कामती, वेळापूर, माढा, नातेपुते पोलिस ठाण्यांचा समावेश आहे.

मोहोळ पोलिस ठाण्याचे प्रभारी हेमंत शेडगे यांची बदली पुणे ग्रामीणमध्ये झाली आहे. त्यामुळे मोहोळ पोलिस ठाण्याची जबाबदारी ग्रामीण पोलिसांच्या मानव संसाधन शाखेचे बाजीराव पोवार यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तर कामती पोलिस ठाण्याचे प्रभारी ज्ञानेश्वर उदार यांचीही बदली पुणे ग्रामीणमध्ये झाल्याने त्याठिकाणी सहायक पोलिस निरीक्षक बसवेश्वर जकिकोरे यांची बदली झाली आहे. मंद्रूप पोलिस ठाण्याचा पदभार आता पहिल्यांदाच पोलिस निरीक्षकांकडे देण्यात आला असून या पोलिस ठाण्याचा पदभार मंदिर सुरक्षा येथील शंकर पटवारी यांच्याकडे असणार आहे. पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांच्याकडे वेळापूर पोलिस ठाण्याचा पदभार सोपविण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर यांच्याकडे नातेपुते पोलिस ठाणे, करमाळा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रोहित शिंदे यांच्याकडे माढा पोलिस ठाण्याचा पदभार दिला आहे. वेळापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांची बदली स्थानिक गुन्हे शाखेकडे करण्यात आली आहे. बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी सध्याचा कार्यभार सोडून तत्काळ बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे, असेही पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: चाकरमान्यांना दिलासा! मुंबई लोकलच्या 'या' मार्गावर १९ फेब्रुवारीपासून अतिरिक्त ट्रेन चालवणार, पण कोणत्या? वाचा...

ट्रिगर लागू झाल्यानंतरही पीकविमा परतावे नाही; मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच, योजना आहे तरी कुणासाठी?

Pune Crime News : पुण्यात धारदार हत्यारांनी हल्ला करणाऱ्या चौघांना अटक

Latest Marathi News Live Update : मध्य रेल्वे मध्ये घेण्यात घेणार विशेष मेगा ब्लॉक

Grain Export: शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय! गहू-साखर निर्यातीला सरकारकडून मंजुरी; कृषी निर्यातीत नवा अध्याय

SCROLL FOR NEXT