Ajit Pawar 
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : आपणही अजमेरला चादर चढवायला जातो ; त्र्यंबकेश्वर प्रकरणावरुन अजित पवार संतापले

Sandip Kapde

त्र्यंबकेश्वर येथील घटनेवर सुरू असलेल्या राजकारणावर मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. याप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन केली आहे. मात्र अजित पवार चांगलेच संतापले आहेत. हा पुरोगामी महाराष्ट्र असल्याचे अजित पवार म्हणाले.

त्र्यंबकेश्वर, शेवगाव, अकोला इथं घडलेला प्रकार महाराष्ट्राला शोभणारा नाही. ह्या घटना घडू नयेत. अशा घटना होऊ नयेत म्हणून राज्य सरकार आणि पोलिसांची जबाबदारी आहे. कुणी भावनिक मुद्दा उपस्थित करुन जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण केला तर महाराष्ट्रातील पुरोगामी जनता ते कदापी सहन करणान नाही, असे अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.

अजित पवार म्हणाले, त्र्यंबकेश्वरच्या बाबतीत काही संघटना समोर आल्या आहेत. कोणी तिथं गौमुत्र शिंपडले, कुणाला काय शिंपडायचं आहे ते शिंपडा. तो ज्याचा त्याचा अधिकार आहे. मात्र राज्यात सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदान राहतात. आपणनही अजमेरला चादर चढवायला जात असतो.

त्र्यंबकेश्वरच्या स्थानिक लोकांनी, आमदरांनी मला फोन करुन सांगितले. ती शंभर वर्षाची परंपरा आहे. अशाप्रकारच्या गोष्टी जाणीवपूर्वक घडवून आणल्या जात आहेत. सोशल मीडियाचा वापर करुन तेढ निर्माण केला जातोय, हे ताबोडतोब थांबवले पाहीजे. विकासकामांवर मते मागा धार्मिक तेढ निर्माण करु नका, असे अजित पवार म्हणाले.

काही राजकीय पक्षाने नेते किंवा त्यांचे प्रवक्ते वातावरण प्रदुषीत कसं होईल. अधिक तेढ कसा निर्माण होईल, हा प्रयत्न करतात, असा आरोप देखील अजित पवार यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : अमित ठाकरे सपत्नीक वरळी डोममध्ये पोहचले; राज अन् उद्धव ठाकरेही रवाना

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

SCROLL FOR NEXT