UBT leader Ambadas Danve Share Eknath Shinde old post receiving AB form from Uddhav Thackeray  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Shinde Vs Thackeray : 'उद्धव ठाकरेंच्या हातून AB Form का घेतला बरं?' ठाकरे सेनेचं एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर

शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला आहे. यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

रोहित कणसे

शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला आहे. यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यादरम्यान या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा लोकशाही आणि बाळासाहेबांच्या विचारांचा विजय असून घराणेशाही आणि एकाधिकारशाहीचा पराभव आहे असे वक्तव्य केलं. दरम्यान या टीकेला उद्धव ठाकरे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. (Shivsena MLA Disqualification Result)

उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जुना फोटो शेअर केला आहे." मुख्यमंत्री शिंदे यांना २०१९ साली विधानसभेचा एबी फॉर्म घेताना घटना दुरुस्ती, घराणेशाही, एकधिकारशाही वगैरे वगैरे तुम्हाला दिसली नव्हती. हुडी घालून आलेला माणूस रात्रीतून कानगोष्टी करून गेला आणि तुम्हाला अचानक साक्षात्कार झाला होता का?" असा खोचक सवाल अंबादास दानवे यांनी विचारला आहे.

फोटोमध्ये काय आहे?

दानवे यांनी शेअर केलेला फोटो हा एकनाथ शिंदे याच्या ट्वीटचा स्क्रीनशॉट आहे. हे ट्वीट ३० सप्टेंबर २०१९ रोजी करण्यात आलं आहे. ज्यामध्ये एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या हातून एबी फॉर्म घेताना दिसत आहेत. तसेच या ट्वीटमध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे साहेब यांनी आज विधानसभा निवडणूक२०१९ करिता कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे अधिकृत उमेदवार म्हणून एबी फॉर्म देऊन पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दर्शविला.मा.उध्दवजी ठाकरे साहेबांचे मनस्वी आभार, असेही म्हटलं आहे.

आता हे ट्वीट डिलीट करू नका

शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एकनाथ शिंदे यांचे ट्वीट रिपोस्ट करण्यात आलं आहे तसेच त्यासोबत जर पक्षप्रमुख पदच मान्य नव्हतं तर त्यांच्या हातून AB form का घेतला बरं? असा प्रश्न विचारण्यात आला आहे. आता हे ट्विट डिलीट करू नका! असा सल्ला देखील यावेळी देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT