CM Ekanth Shinde , Thackeray family uddhav thackeray Aditya thackeray mumbai sakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena: आदित्य ठाकरेंचं शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य म्हणाले, “शिवसेना फुटीला उद्धव ठाकरे आणि मी…”

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात मोठ्या घडामोडी घडल्या

अंकिता खाणे (Ankita Khane)

एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार यांनी शिवसेनेत केलेल्या बंडामुळे राज्यात मोठं सत्तानाट्य घडलं. एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं. त्यामुळे शिवसेनेत फूट पडली. यानंतर शिवसेनेत फूट कोणामुळे पडली, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या. काही जणांनी यासाठी भाजपाला, तर काहींनी राष्ट्रवादीला जबाबदार धरलं होतं. यावर शिवसेना (ठाकरे गटाचे) आमदार आदित्य ठाकरेंनी यावर सविस्तर भाष्य केलं आहे.

‘इंडिया टुडे’च्या एका कार्यक्रमावेळी बोलताना आदित्य ठाकरेंनी शिवसेनेतील बंडखोरीवरून मोठे गौप्यस्फोट केले आहेत. “शिवसेनेतील फुटीला उद्धव ठाकरे आणि मी जबाबदार आहे. उद्धव ठाकरेंनी आमदारांवर आंधळा विश्वास ठेवला. आम्ही त्यांना आमचे समजत होतो. गेल्या ४० ते ५० वर्षात मुख्यमंत्र्यांकडे राहिलेलं नगरविकास खातं देखील आम्ही त्यांना दिलं होतं,” असे सांगत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे.

पुढे आदित्य ठाकरे म्हणाले की, “आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. आम्हाला वाटलं नव्हतं ते पाठीमागून वार करतील. सत्तेत असताना विरोधी पक्षातील नेत्यांना तडीपारीच्या नोटीसा दिल्या नाहीत. अथवा त्यांच्यावर पाळत ठेवली नाही. मात्र, आमच्या आमदारांवर पाळत ठेवली नाही, ही आमची चूक होती. राजकारण ही घाणेरडी जागा नाही,” असंही आदित्य ठाकरे पुढे म्हणालेत.

एकनाथ शिंदे मातोश्रीवर रडले! भाजपमध्ये गेलो नाहीतर जेलमध्ये टाकतील

“हे ४० लोकं त्यांच्या स्वत:च्या जागांसाठी आणि पैशांसाठी तिकडे गेले आहेत. सध्याचे मुख्यमंत्री त्यावेळी माझ्या घरी येऊन रडले होते. कारण त्यांना केंद्रीय यंत्रणा अटक करणार होत्या. त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी भाजपसोबत गेलो नाही तर मला अटक होईल” आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT