Uddhav Thackery  Esakal
महाराष्ट्र बातम्या

'बळी दिलेल्या रेड्यांचा तळतळाट चंद्रकांत पाटलांना लागला असेल, अन्यथा त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला नसता'

भाजपचे नेते अलीकडच्या काळात इतक्या बेतालपणे का बोलत आहेत?

सकाळ डिजिटल टीम

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पैठण येथे एका कार्यक्रमात बोलताना कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. या पार्श्वभूमीवर संपुर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त होत आहे. त्यानंतर पिंपरी-चिंचवड येथील मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळ्याच्या उद्घाटनासाठी गेलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रकारही शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडला. त्यावरून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यावर आज शिवसेनेकडून हल्लाबोल करण्यात आला आहे.

चंद्रकांत पाटील यांना शिक्षणमंत्री म्हणून भिकेचे डोहाळे लागले आहेत व तेच त्यांच्या मुखातून बाहेर पडत आहे. भाजपचे नेते अलीकडच्या काळात इतक्या बेतालपणे का बोलत आहेत? त्यांना शिंदे गटाने कामाख्या मंदिरात बळी दिलेल्या रेड्यांचे तळतळाट आणि शाप लागले आहेत का? अन्यथा शिकल्या-सवरलेल्या माणसांच्या डोक्यावर असा परिणाम झालाच नसतात, अशी बोचरी टीका शिवसेनेचे ठाकरे गटाच्या मुखपत्रातुन करण्यात आली आहे.

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पैठण येथे कार्यक्रमात बोलताना कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याच पार्श्वभूमीवर संपुर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात आहे. त्यानंतर पिंपरी-चिंचवड येथील मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळ्याच्या उद्घाटनासाठी गेलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रकारही शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडला. त्यावरून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यावर आज शिवसेनेकडून हल्लाबोल करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर 'सामना'तून चंद्रकांत पाटील आणि शाईफेकीच्या प्रकरणाबाबत सविस्तरपणे भाष्य करण्यात आले आहे. महाराष्ट्रात सध्या कटुतेचा जो स्फोट झाला आहे, या वातावरणास भाजपच जबाबदार आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी येथे शाईफेक झाली. अशा घटनांचे समर्थन करता येणार नाही. पण शेवटी पेरले तेच उगवताना दिसत आहे. पाटील यांनी महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत वक्तव्य केल्यामुळे शाईफेकीचा स्फोट झाला, असे म्हटले जाते. पण महाराष्ट्रातील एक वर्ग वेगळेच सांगतो आहे. शिंदे गटाचे आमदार गुवाहाटी येथे कामाख्या देवीची वेगळ्या पद्धतीने पूजाअर्चा करून आले. तेथे तंत्र, मंत्र, करणी वगैरे प्रकार केले जात असल्याची वदंता आहे. शिंदे गटाच्या खासदारांनी तिकडे जाऊन नक्की काय केले ते त्यांनाच माहीत, पण तेव्हापासून महाराष्ट्रातील भाजप मंत्री व पुढाऱ्यांची डोकी साफ भरकटून गेली आहेत. ते वेड्यासारखे बरळू लागले आहेत. त्यामुळे शिंदे गटाने नक्की कोणाविरोधात जारण-मारण केले, असा प्रश्न महाराष्ट्राला पडला असल्याचे 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT