Uddhav Thackeray sakal media
महाराष्ट्र बातम्या

'मार्मिक' ही मशाल आहे; एकसष्ठीनिमित्त उद्धव ठाकरेंनी दिल्या सदिच्छा

विनायक होगाडे

मुंबई: आज 'मार्मिक'चा ६१ वा वर्धापनदिन आहे. यानिमित्त शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. या वर्धापनदिनानिमित्त त्यांनी शिवसैनिकांना सदिच्छा दिल्या आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय की, मार्मिक आता नव्या रुपात उपलब्ध झाला आहे, मात्र, मार्मिकच्या वाटचालीत सर्व शिवसैनिकांचा सहभाग आहे. मार्मिकनेच खऱ्या अर्थाने वाटचाल आखून दिली आहे. लढण्यासाठी प्रेरणा दिली. फ्री प्रेस जर्नलमधील नोकरी सोडून बाळासाहेबांनी मार्मिक हे स्वत:चं साप्ताहिक सुरु केलं. हा विचारच मुळात धाडसाचा होता. व्यंगचित्र साप्ताहिक सुरु करणं आव्हानात्मक होतं. आता मार्मिक ६१ वर्षांचा झाला आहे. तो नक्कीच शतायुषी होईल. मार्मिक ही मशाल आहे.

पुढे त्यांनी म्हटलंय की, या साप्ताहिकामागे मराठी माणसांच्या आयुष्यामध्ये थोडा विरंगुळ्याचा क्षण यावा हा सुरुवातीचा विचार होता. मात्र, नंतर या मनोरंजनाची जागा मनोव्यथेने घेतली. त्यातूनच शिवसेनेचा जन्म झाला. ही मोठी चळवळ या साप्ताहिकाने सुरु केली. शिवसेना ही एकमेव संघटना जीची स्थापना एका व्यंगचित्रकाराने केली आहे. व्यंगचित्र म्हणजे वेड्यावाकड्या रेघोट्या नव्हेत. व्यंग काढायचं म्हणून काढणं व्यंगचित्र नव्हे, असंही त्यांनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

Food Adulteration Crackdown: अन्न भेसळ पथकाच्या धास्तीने टाकळी राजेरायमध्ये सर्व दुकाने बंद; गुटखा व भेसळयुक्त सुट्या तेलाच्या खुलेआम विक्रीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT