uddhav thackeray on shinde group shivsena party whip mla disqualification after election commission order
uddhav thackeray on shinde group shivsena party whip mla disqualification after election commission order  esakal
महाराष्ट्र

Shiv Sena : शिंदे गटाचा व्हीप न मानल्यास ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरतील? ठाकरे स्पष्टच बोलले

सकाळ डिजिटल टीम

निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि निवडणूक चिन्ह याबद्दल एकनाथ शिंदेंच्या बाजून निर्णय दिल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. यादरम्यान आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटाकडून शिवसेनेच्या सर्व आमदारांसाठी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर व्हीप बजावाला जाऊ शकतो.

हा व्हीप ठाकरे गटाच्या आमदारांना लागू होईल का? आणि तो मान्य केला गेला नाही तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होईल का? याबद्दल चर्चांना उधाण आले आहे. यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परीषदेत याबद्दल खुलासा केला आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले...

शिंदे गटाकडून व्हिप मान्य केला नाही तर आमदार अपात्र होतील का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला. यावर ठाकरे ,म्हणाले की आमदार अजिबात अपात्र होऊ शकत नाहीत. कारण दोन गटांना मान्यता मिळाली तेव्हा दोन गट आहेत हे मान्य करण्यात आले होते. तेव्हा त्यांना एक चिन्ह आम्हाला एक चिन्ह देण्यात आलं होतं.

मुळ नाव आणि चिन्ह त्यांनी देता कामा नये. खातरजमा केल्याशिवाय ते देऊ शकत नव्हते. आम्ही त्याला चॅलेंज केलं आहे. त्या गटाला निवडणूक आयोगाने नाव आणि चिन्ह दिलं आहे. आमच्या गटाचा आणि त्यांच्या गटाचा काही संबंध नाही असे ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

येत्या २७ फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी शिवसेना आमदारांना आज झालेल्या बैठकीत काही सूचना केल्या आहेत. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापानाच्या कार्यक्रमाला शिवसेनेच्या सर्व ५६ आमदारांना उपस्थित राहण्याची सूचना त्यांनी केली आहे.

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे गट शिवसेना पक्ष म्हणून सहभागी होणार आहे. यादरम्यानठाकरे गट नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी मात्र शिवसेनेचा व्हीप सर्वांना लागू असेल , असे म्हणाले आहेत. त्यामुळे शिंदे गटाकडून जर व्हीप जारी करण्यात आला, तर तो उद्धव ठाकरे,यांच्यासोबतच ठाकरे गटातील सर्वांना लाीगू असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT