Uddhav Thackeray Sanjay Raut Sakal
महाराष्ट्र बातम्या

शिवसेना आपलीच हे सिद्ध करायला ठाकरे पुरावे देणार? उद्धव ठाकरे म्हणतात...

शिंदेंच्या ऐतिहासिक बंडानंतरची ही पहिलीच जाहीर मुलाखत आहे.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेमध्ये ऐतिहासिक बंड झालं आणि शिवसेनेच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला. या धक्क्यानंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत चांगलेच सक्रिय झाले आहेत. राज्यभराचे दौरे, शिवसैनिकांच्या सभा अशा गोष्टींना वेग आला आहे. या सगळ्या घडामोडींवर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे भाष्य केलं आहे. शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी सगळ्याबद्दल खुलासा केला आहे.

शिवसेना आपलीच हे सिद्ध करायला ठाकरे पुरावे देणार का या संजय राऊतांच्या प्रश्नाला उद्धव ठाकरेंनी सडेतोड उत्तर दिलंय. ठाकरे म्हणाले, "माझा अजूनही देशाच्या घटनेवर भरवसा आहे, कायद्यावर भरवसा आहे. चोऱ्या-माऱ्या सगळीकडेच चालतात, असं माझं अजिबात मत नाही. मी जे म्हटलं की सत्यमेव जयते. नाहीतर हे वाक्य तुम्हाला पुसावं लागेल आणि दोन वाक्यं करावी लागतील, एकतर असत्यमेव जयते आणि दुसरं वाक्य म्हणजे सत्तामेव जयते. सत्तामेव जयतेपुढे तुम्ही असत्य घेऊन जर काही करणार असाल तर ते लोक खपवून घेणार नाहीत. लोक निवडणुकांची वाट पाहतायत. आम्हाला पुरावे द्यायची गरज नाही. लोक म्हणतात निवडणूक येऊ द्या यांना पुरूनच टाकू"

शिवसेना आणि संघर्ष एकमेकांच्या पाचवीला पूजलेले

शिवसेना ही तळपती तलवार ती म्यानात ठेवली तर ती गंजते. त्यामुळे ती तळपलीच पाहिजे आणि तळपणं म्हणजे संघर्ष आलाच. जिथे अन्याय तिथे वाघ हे शिवसेनेचं ब्रीदवाक्यच आहे. सध्या शिवसेनेवर एक वादळ आल्याचा आभास निर्माण केला जातोय. वादळ म्हटलं की पालापाचोळा उडतोच. तो पालापाचोळा सध्या उडतोय. एकदा तो पालापाचोळा खाली बसला की सगळं खरं दृश्य समोर येईल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT