uddhav thackeray
uddhav thackeray 
महाराष्ट्र

जनतेच्या भावना सरकारकडे पोहचवत आहोत- ठाकरे

सकाळवृत्तसेवा

टोकाची भूमिका घेण्यासाठी मी मागे पुढे पहाणार नाही

मुंबई- नोटबंदीवरुन शिवसेनेने आज पुन्हा एकदा तलवार उपसली आहे. टोकाची भूमिका घेण्यास मी मागे-पुढे पाहणार नाही, असा स्पष्ट इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला. मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज (गुरुवार) मनसेच्या 3 नगरसेवकांनी प्रवेश केला. यानंतर ते बोलत होते.

ब्रिटनमध्ये ब्रेक्सिटप्रमाणे जनमत चाचणी घेतली जात आहे. पण जनतेचा कौल बघून तिकडच्या राष्ट्राध्यक्षांनी पायउतार व्हायचा निर्णय घेतला होता. इथे तसं होणार आहे? असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला.

जनतेच्या डोळ्यात अश्रू असताना भावूक होण्यात काय अर्थ आहे, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला. तसंच सव्वाशे कोटी जनतेचा निर्णय एक व्यक्ती घेऊ शकत नाही. नोटबंदीआधी जनतेला विश्वासात घेणं गरजेचं होतं, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

“माजी पंतप्रधान मनमोहन सिंह हे नावाजलेले अर्थतज्ज्ञ होते, त्यामुळे त्यांचे मत गांभीर्याने घ्यावेच लागेल. काळ्या पैशाची वसुली करताना पंतप्रधानांच्या मनात काही काळंबेरं आहे का याची शंका येते”, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.

सामान्यांकडून खंडणीसारखा पैसा गोळा केला जातोय. जनतेचे अश्रू तुम्ही का पुसले नाही. ज्या जनतेने तुम्हाला मोठ्या आशेने निवडून आणले, त्यांच्या डोळ्यात तुम्ही अश्रू आणलेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

 विजय मल्ल्याने कोणत्या जिल्हा बँकेतून कर्ज काढले होते का? त्याने ज्या बँकेतून कर्ज काढले होते, त्या बँकेला मात्र नोटा बदलण्याचे अधिकार कसे काय दिले? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.


उद्धव ठाकरे म्हणाले -

  • ब्रेक्सिट प्रमाणे जनमत चाचणी घेतली जात आहे. पण जनतेचा कौल बघून तिकडच्या राष्ट्राध्यक्षांनी पायउतार व्हायचा निर्णय घेतला होता. इथे तसं होणार आहे?
  • माझी पंतप्रधान मनमोहन सिंघ हे नावाजलेले अर्थतज्ञ होते त्यामुळे त्यांचे मत गांभीर्याने घ्यावेच लागेल.
  • काळ्या पैश्याची वसुली करतांना पंतप्रधानांच्या मनात काही काळंबेरं आहे का याची शंका येते.
  • सामान्यांकडून खंडणी सारखा पैसा गोळा लेला जातोय
  • जनतेचे अश्रू तुम्ही का पुसले नाही... ज्या जनतेने तुम्हाला मोठ्या आशेने निवडुन आणले... त्यांच्या डोळ्यात तुम्ही अश्रू आणलेत...
  • विजय मल्ल्या ने कोणत्या जिल्हा बँकेतून कर्ज काढले होते का...? त्याने ज्या बँकेतून कर्ज काढले होते.... त्या बँकेला मात्र नोटा बनवण्याचे अधिकार दिले कसा काय...?
  • सरकारने ३१ डिसेंबर पर्यंत मुदत द्यायला पाहीजे.... 1000 आणि 500 रुपयांची जुन्या नोटा पेट्रोलपंप, हॉस्पीटल वापरण्यासाठी ती पण पुरेल असे वाटत नाही
  • नाबार्ड करून या काळात दरवर्षी कर्जवाटप होतो. मात्र यावेळी जाहीर पत्रकार परिषद घेण्यात आली.
  • नोटबंदी आणि या मदतीचा काही संबंध नाही
  • जनतेच्या भावना आम्ही सरकारकडे पोहचवत आहोत..
  • टोका ची भूमिका घेण्यासाठी मी मागे पुढे पहाणार नाही
  • जी लोक येत आहेत... त्यांना शिवसेनेबद्दल विश्वास वाटतोय...
  • मी कोणताही पक्ष टार्गेट केलेला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : दिंडोरीत बंडखोरी, हरिश्चंद्र चव्हाण भरणार अपक्ष अर्ज

SCROLL FOR NEXT