Uddhav-Thackeray-Ajit-Pawar File Photo
महाराष्ट्र बातम्या

रंग बदलण्याचं सरकारमध्ये धाडस : उद्धव ठाकरे

सिद्धार्थ लाटकर

सातारा : मल्हारपेठ (ता. पाटण) येथील पोलिस ठाण्याची इमारत व पोलिस निवासस्थानाचे ई-भूमिपूजन आज (गुरुवार) मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आदींची उपस्थिती हाेती. (uddhav-thackreay-ajit-pawar-mahavikas-aghadi-satara-breaking-news)

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इमारतीचा रंग बदलण्याची सूचना प्रशासनास केली. त्याचा धागा पकडत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले मला बरं वाटल. मला वाटले मी एकटाच कलाकार आहे. हल्ली मी माझी कला, फाेटाग्राफी बासनात गुंडाळून ठेवले आहे. जे समाेर येत आहे ते पाहत असताे. अनेक जण अनेक रंग दाखवत आहे. हे रंग बघावे लागतात. पण रंग बदलण्याचे धाडस असावे लागते. ते धाडस सुद्धा या सरकारमध्ये आहे. नुसते लाेक रंग दाखवित आहेत. ते रंग बघताेय आपण त्याला काय अर्थ नाही. ते बदलण्याचे धाडस देखील या सरकारमध्ये आहे हे सुद्धा मनातून बाहेर आलेले आहे अशी टिप्पणी देखील मुख्यमंत्री ठाकरेंनी केली.

या कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव, पोलिस महासंचालक संजय पांडे, पोलिस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक (पोलिस गृहनिर्माण महामंडळ) विवेक फणसळकर व अधिकारी ऑनलाइन, तर विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील उपस्थित हाेते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT