x mla adam master

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! गॅस मिळेना, सोलापुरातील १० हजार रिक्षा थांबल्या; माजी आमदार नरसय्या आडम मैदानात, पालकमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा, वाचा...

इराण- अमेरिका युद्धाचा फटका सोलापुरातील रिक्षाचालकांना बसला आहे. गॅस नसल्याने शहरातील १० पैकी एक-दोनच पंप सध्या सुरू आहेत. त्यामुळे शहरातील ३० हजार रिक्षांना दररोज गॅस मिळत नाही. या पार्श्वभूमीवर सोलापुरातील दहा हजारांहून अधिक रिक्षा जागेवरच थांबल्याचे रिक्षा चालक- मालक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांंगितले.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : इराण- अमेरिका युद्धाचा फटका सोलापुरातील रिक्षाचालकांना बसला आहे. गॅस नसल्याने शहरातील १० पैकी एक-दोनच पंप सध्या सुरू आहेत. त्यामुळे शहरातील ३० हजार रिक्षांना दररोज गॅस मिळत नाही. या पार्श्वभूमीवर सोलापुरातील दहा हजारांहून अधिक रिक्षा जागेवरच थांबल्याचे रिक्षा चालक- मालक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांंगितले.

प्रत्येक रिक्षाला दररोज चार किलो गॅस लागतो, त्यातून त्यांना दिवसभरात सरासरी ८०० ते ९०० रुपये मिळतात. मात्र, गॅसअभावी दररोज ८० ते ८५ लाख रुपयांचा फटका बसल्याचेही पदाधिकारी सांगतात. शाळकरी मुलांना ने-आण करायला देखील दीड हजारांहून अधिक रिक्षा आहेत. गॅस नसल्यामुळे हक्काचे ते भाडे देखील हातातून गेल्याची खंत चालकांना आहे. बचत गटाचे हप्ते, बॅंकांचे हप्ते भरणे देखील अनेकांना कठीण झाले आहे.

दररोज पहाटे पाच ते सायंकाळी सहा आणि त्यानंतर पहाटे पाच वाजेपर्यंत एकाच घरातील दोघेजण रिक्षा चालवून कुटुंबाची जबाबदारी सांभाळायचे. पण, आता गॅस नसल्याने ते दोघेही निवांत बसून आहेत. अडचणीतील रिक्षा चालकांच्या मागे ‘माकप’चे माजी आमदार नरसय्या आडम उभारले असून, त्यांच्या नेतृत्वात ५ एप्रिलला रिक्षा चालकांचा महामेळावा होणार आहे.

...तर पालकमंत्र्यांना घालणार घेराव

सोलापूर शहरातील एलपीजी गॅसचे दहा पंप बंद आहेत. शहरातील अंदाजे १६ हजार रिक्षा गॅसवर चालतात. गॅस मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणावर रिक्षा थांबून आहेत. गॅस मिळत नसताना देखील शासनाकडून काहीही उपाययोजना होत नाही. या पार्श्वभूमीवर ५ एप्रिल रोजी दत्तनगर येथे सायंकाळी पाच वाजता रिक्षा चालकांचा महामेळावा घेतला जाणार आहे. त्यांची रोजीरोटी बंद पडली आहे, बॅंकांचे हप्ते देणे मुश्किलीचे झाले आहे. त्यामुळे महामेळावा घेऊन पुढे पालकमंत्र्यांना घेराव घालणार आहोत.

- नरसय्या आडम, माजी आमदार, सोलापूर

रिक्षा चालकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न

इराण-अमेरिकेतील युद्धाचा फटका रिक्षा चालकांना बसला आहे. सोलापूर शहरातील दहा हजारांवर रिक्षा पंपावर गॅस मिळत नसल्याने थांबून आहेत. त्यामुळे सोमवारी (ता. ३०) माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वात लाल बावटा कार्यालयात रिक्षा चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. कंत्राटी पद्धतीने रिक्षा चालवायला घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्यासमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे.

- अमोल डुरके, अध्यक्ष, रिपब्लिकन सेना शिक्षा चालक-मालक संघटना, सोलापूर

सोलापूर शहरातील रिक्षांची सद्य:स्थिती

  • एकूण अंदाजे रिक्षा

  • ३०,०००

  • गॅसअभावी रिक्षा बंद

  • १०,०००

  • दररोजचे अंदाजे नुकसान

  • ८०-८५ लाख रुपये

  • रिक्षावर अवलंबून कुटुंबे

  • ५५,०००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT