solapur univercity Esakal
महाराष्ट्र बातम्या

विद्यापीठाची परीक्षा २० नोव्हेंबरपासून! दररोज ३ पेपर; निकाल वेळेत लागण्यासाठी उत्तरपत्रिकांची तपासणी ऑफलाईनच

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची परीक्षा २० नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. परीक्षेनंतर निकालास विलंब होऊ नये म्हणून आता पूर्वीप्रमाणेच पारंपारिक अभ्यासक्रमांचे पेपर ऑफलाईन पद्धतीनेच तपासले जाणार आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची परीक्षा २० नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. परीक्षेनंतर निकालास विलंब होऊ नये म्हणून आता पूर्वीप्रमाणेच पारंपारिक अभ्यासक्रमांचे पेपर ऑफलाईन पद्धतीनेच तपासले जाणार आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमांचे पेपर तपासणीसाठी मात्र ‘ऑनस्क्रिन मूल्यमापन’ पद्धतीचा अवलंब होणार आहे.

विद्यापीठाच्या स्थापनेपासून परीक्षा विभागाला अनेक अधिकारी मिळाले, पण कामकाज अपेक्षेप्रमाणे सुधारले नसल्याची ओरड कायम राहिली. पण, विद्यापीठाने कोरोना काळात व तलाठी भरतीच्या पार्श्वभूमीवर अवघ्या काही दिवसांत निकाल जाहीर करून रेकॉर्ड देखील केले आहे. पण, मागील सत्र परीक्षेचे निकाल व त्यासंबंधीचे कामकाज अजूनही पूर्ण झालेले नाही.

२० नोव्हेंबरपासून बीए, बी-कॉम, बीएससी, बीबीए, बीसीए या अभ्यासक्रमांची परीक्षा सुरु होईल. परीक्षा झाल्यानंतर सोलापूर, पंढरपूर व बार्शी याठिकाणी उत्तरपत्रिका संकलित करून पूर्वीप्रमाणे ऑफलाईन तपासणीला सुरवात होईल. ऑनस्क्रिन मूल्यमापन पद्धतीनुसार निकाल ३० दिवसांत जाहीर होणे अपेक्षित असतानाही निकालास विलंब झाला.

प्राध्यापकांनी अनेक तक्रारी केल्या आणि त्या विचारात घेऊन आता ऑफलाईन पद्धतीनेच पेपर तपासणीचा निर्णय झाला. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी मात्र, ‘ऑनस्क्रिन’ पद्धतीनेच होणार आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात परीक्षा संपवून २० फेब्रुवारीपर्यंत पूर्ण निकाल जाहीर होतील, असे नियोजन असल्याची माहिती परीक्षा विभागाकडून देण्यात आली.

दररोज तीन सत्रात पेपर

विद्यापीठाची सत्र परीक्षा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरु करण्याचे नियोजन होते. परंतु, पूर्वीच्या निकालास विलंब झाल्याने परीक्षा २० नोव्हेंबरपासून सुरु करण्याचे निश्चित झाले. त्यानुसार आता दररोज तीन सत्रात पेपर होतील. पहिला पेपर सकाळी ९ ते १२ या वेळेत होईल. दुसरा पेपर त्याच दिवशी दुपारी १२ ते दोन आणि तिसरा पेपर दुपारी तीन ते सायंकाळी सहा या वेळेत होणार आहे. एका विद्यार्थ्याला दररोज एकच पेपर द्यावा लागेल, असे नियोजन करण्यात आले आहे.

परीक्षांचे नियोजन अंतिम, निकाल वेळेतच

पारंपरिक व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक अंतिम झाले आहे. पारंपरिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा महाविद्यालयांतर्फे होतील, तर इतर वर्षाच्या परीक्षा विद्यापीठाकडून घेतल्या जाणार आहेत. वेळेत परीक्षा संपवून निकालास विलंब होणार नाही, यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.

- डॉ. प्रकाश महानवर, कुलगुरु, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT