Admission
Admission 
महाराष्ट्र

‘आयडॉल’साठी प्रवेशाची पुन्हा संधी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - विविध राज्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश घेण्यात विद्यार्थ्यांना अडचणी आल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठांनी केलेल्या मागणीनंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) प्रवेश घेण्याची मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) सर्व वर्गांच्या प्रवेशासाठी २० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  

यूजीसीने आयडॉलच्या जुलै सत्रासाठी ३१ ऑगस्टपर्यंत प्रवेशाची मुदत दिली होती; मात्र विविध राज्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक विद्यार्थी प्रवेश घेऊ शकले नव्हते. या पार्श्‍वभूमीवर यूजीसीने ११ सप्टेंबरला परिपत्रक प्रसिद्ध करून प्रवेशाची मुदत वाढवली. आयडॉलच्या बीए, बीकॉम व बीएस्सी आयटी, एमए, एमए शिक्षणशास्त्र, एमकॉम, एमए व एमएस्सी गणित, एमएस्सी आयटी, एमसीए, पीजीडीएफएम व पीजीडीओआरएम या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना २० सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन प्रवेश घेता येणार आहे. प्रवेश शुल्कही ऑनलाइन पद्धतीने भरावयाचे आहे. हे अर्ज http://idoloa.digitaluniversity.ac या संकेतस्थळावरून करता येतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "आम्ही भाजपच्या मुख्यालयात येतोय हिंमत असेल तर..."; केजरीवालांचं पंतप्रधान मोदींना थेट आव्हान

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: ऋतुराज गायकवाडने जिंकला टॉस; बेंगळुरू-चेन्नई संघात मोठे बदल; जाणून घ्या प्लेइंग-11

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

SCROLL FOR NEXT