Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update : शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ! पुढचे 48 तास महत्त्वाचे, राज्यातील काही भागात पावसाची शक्यता

राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

देशासह राज्यात वातावरणात सातत्याने बदल होताना दिसून येत आहेत. काही भागात उष्णतेची लाट आहे. तर राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे. यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागांत 31 मेपर्यंत अवकाळी पाऊस बरसणार आहे.

तर, राज्यातील काही शहरांचा कमाल तापमानाचा पारा चाळीस अंशांपर्यंत घसरला आहे. आता नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तर येत्या दोन दिवसांत पाऊस अंदमान, निकोबार बेटे आणि बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग व्यापणार आहे.

राजस्थान ते मध्य प्रदेशपर्यंत चक्रिय स्थिती निर्माण झाली आहे. तर दक्षिण भारताकडून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राकडे वाहत आहेत. या स्थितीमुळे राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आला आहे. तर राज्याच्या काही भागात काल पावसाने हजेरी लावली होती.

हिंगोली, भंडारा, गोंदिया, नागपूरसह अन्य काही भागांमध्ये काल अवकाळी पावसाने हजेरी लावली. गारा आणि वीजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उष्णतेपासुन काहीसा दिलासा मिळाला आहे.

तर दक्षिण भारतातील काही भागातही पाऊस हजेरी लावणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. राज्याच्या जवळपास सर्वच भागांमध्ये मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस बरसणार आहे. काही भागांत अवकाळी मुसळधार बरसेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद याठिकाणी आज मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Play Off Scenario: गुजरात टायटन्सचा सलग पाचवा विजय! सनरायझर्स हैदराबादला नमवून POINT TABLE मध्ये अव्वल, अनपेक्षित कलाटणी

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सच्या संघात बदल... प्ले ऑफच्या शर्यतीसाठी मिळालं बळ... पुण्याच्या रामकृष्ण घोषच्या जागी एन्ट्री

Triple Accident : रजापूर शिवारात तिहेरी अपघात; वाळू वाहतूक करणारा हायवा पलटी, दोन कारची धडक, चार ते पाच जण किरकोळ जखमी

Amit Satam: पंतप्रधानांच्या 'इंधन बचती'ला मुंबई भाजपचा हरताळ; अमित साटम यांचा २५ गाड्यांचा 'शाही' ताफा वादाच्या भोवऱ्यात!

GT vs SRH Live : टप्पा खाऊन आऊट... अभिषेक शर्मा विचित्र पद्धतीने बाद झाला, कागिसो रबाडाला हसू आवरेना... Video Viral

SCROLL FOR NEXT