Hail rain esakal
महाराष्ट्र बातम्या

Unseasonal Rain : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला इशारा! जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये गारपिटीची शक्यता

राज्यात वळवाच्या सरींनी हजेरी लावल्याने उन्हाचा चटका काही अंशी कमी झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्यात वळवाच्या सरींनी हजेरी लावल्याने उन्हाचा चटका काही अंशी कमी झाला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात येत्या बुधवारी (ता. १५) वादळी वाऱ्यासह पावसाचा तर जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा दिला आहे. कोकणात उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान खात्याने मंगळवारी दिला.

राज्यात गेल्या २४ तासांमध्ये मुंबई, नगर, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. तुरळक ठिकाणी गारपीट झाली. ढगाळ आकाशामुळे उन्हाचा चटका कमी होत असून कमाल तापमान कमी-अधिक होत आहे. राज्यात ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आग्नेय अरबी समुद्रात केरळजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. दक्षिण कर्नाटक परिसरावरील चक्राकार वाऱ्यांची स्थिती वरील कमी दाबाच्या पट्ट्यात विरून गेली आहे.

बुधवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत गारपिटीचा इशारा (येलो अलर्ट) दिला आहे. कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये उष्ण लाटेचा इशारा दिला आहे.

राज्यातील उन्हाळा (आकडे अंश सेल्सिअसमध्ये) -

पुणे ३७.१, जळगाव ४१.८, कोल्हापूर ३६.७, महाबळेश्वर ३०.१, मालेगाव ४०.२, नाशिक ३७.८, सांगली ३७.३, सातारा ३८.२, सोलापूर ३९.५, सांताक्रूझ ३६.८, डहाणू ३६, रत्नागिरी ३६.२, छत्रपती संभाजीनगर ३८.३, बीड ४०.९, नांदेड ३८.६, धाराशिव ३८.६, परभणी ३९.१, अकोला ४१.८, अमरावती ४०.६, बुलडाणा ३९, ब्रह्मपुरी ४२.२, चंद्रपूर ४१.४, गोंदिया ३९.२, नागपूर ३८.९, वर्धा ४०.

  • उष्ण लाटेचा पावसाचा इशारा (येलो अलर्ट) - ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

  • वादळी पाऊस गारपिटीचा इशारा (येलो अलर्ट) - नाशिक, जळगाव, संभाजीनगर

  • वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) - नंदुरबार, धुळे, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, जालना, बीड, धाराशिव, वाशीम, गडचिरोली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT