Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: पुन्हा रेनकोट, छत्र्या बाहेर काढा; नागपुरात मुसळधार, तर राज्यात गारपिटीसह पावसाची शक्यता; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

Weather Update: मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कर्नाटकापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. अशातच हवामान विभागाने येत्या ४८ तासांत राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कर्नाटकापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

दरम्यान राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीटीची देखील शक्यता आहे, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून विदर्भासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट होत आहे. यामुळे फळबागांसह काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

हवामान विभागाने येत्या ४८ तासांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विदर्भातील वर्धा आणि वाशिम जिल्ह्याचा यामध्ये समावेश आहे. राज्यातील इतर काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे. नागरिकांनी बाहेर पडताना योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.

या ठिकाणी पावसाची शक्यता

बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा , चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली याठिकाणी मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे

छत्रपती संभाजीनगरमध्ये वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह पश्चिम विदर्भात पुन्हा शुक्रवारी वादळी पाऊस झाला. त्यामुळे पिके जमीनदोस्त झाली असून त्यांचे नुकसान वाढले आहे. छत्रपती संभाजीनगरमधील अंभई येथे वादळी पाऊस, तर रहिमाबाद परिसरात शुक्रवारी पुन्हा गारपीट झाली. टाकळी अंबड (घेवरी) येथे दुपारी शेतात काम करीत असताना वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सुधाकर धोंडिराम पाचे (वय ६०) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

पैठण शहर परिसर, तालुक्यातील लोहगाव परिसर, गंगापूर तालुक्यातील कायगाव तसेच घाटनांद्रा परिसरात पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील घनसावंगीत जोरदार पाऊस झाला. अंकुश नगर, वडीगोद्रीत पाऊस झाला. पश्चिम विदर्भात अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू असून सलग तिसऱ्या दिवशी बुलडाणासह वाशीम जिल्ह्यात काही तालुक्यांत जोरदार पावसाने हजेरी दिली. मेहकर, मालेगाव, नांदुरा या तालुक्यांत पाऊस झाला. पुन्हा पिकांचे नुकसान झाले. मेहकर, मालेगाव तालुक्यात वादळी वान्यासह काही ठिकाणी गारपिटही झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: सोशल मीडियावरील TRP ला तुमचे यश समजण्याची चूक करू नका; सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा कुणाला सल्ला?

Radhanagari Dam Water Level : गगनबावड्यासह 12 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी; राधानगरी धरणात 85 टक्के पाणीसाठा, कोल्हापूर जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली

Latest Marathi Update : राहुल गांधींची मोदींवर टीका; 'शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली, धर्मेंद्र प्रधानांना हटवा'

PM Narendra Modi On Paper Leak : पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! पेपरफुटीच्या प्रकरणांची फास्ट ट्रॅक कोर्टात होणार सुनावणी

Ujani Dam: उजनी धरणातील आवक १२,७९७ क्युसेकवर; उपयुक्त पाणीसाठा ५४ टक्के, धरणातून ५,५७० क्युसेक विसर्ग कायम

SCROLL FOR NEXT