Devendra Fadnavis and Aniksha jaisinghani
Devendra Fadnavis and Aniksha jaisinghani  
महाराष्ट्र

Devendra Fadnavis: ...तर फडणवीसांनी गृहमंत्रीपदावरून बाजुला व्हावं...; अनिक्षा प्रकरणी ठाकरे गटाच्या खासदाराची मागणी

सकाळ डिजिटल टीम

Devendra Fadnavis News- अर्थसंकल्पीय अधिवेशनात अमृता फडणवीस यांनी एका डिझायनरविरोधात दाखल केलेल्या तक्रारीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.

हा वाद आता पेटला उद्धव ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तसेच अनिक्षा जयसिंघानी प्रकरणी फडणवीस यांनी गृहमंत्रीपदावरून बाजुला व्हावे. तसेच त्याची स्वतंत्र चौकशी करावी.

प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिस करत आहेत. या प्रकरणी २० फेब्रुवारी रोजी एफआयआर दाखल झाली आहे. पण अनिक्षाला आताच का अटक केलं. मुंबई पोलिस गृहमंत्र्यांनाच रिपोर्ट करतात. ही घटना गृहमंत्र्यांच्या घरी घडली.

ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

हायकोर्ट असो वा सुप्रीम कोर्ट प्रकरणाची त्यांचा कुठेही संबंध असला तर ते बाजुला होतात. पारदर्शकता राहते. इथं तुम्हीच गृहमंत्री, तुम्हालाच व्हिडीओ दिला जातो. तुम्हीच त्या व्हिडीओला क्लिनचीट देतात.

या प्रकरणात ब्लॅकमेलिंग कशासंदर्भात होतय? हे स्पष्ट व्हायला हवं. २०१६ मध्ये हेच मुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते. तरी देखील देशातील सर्वात मोठ्या बुकीला यांच्या घरी कसाकाय ऍक्सेस होता, असा प्रश्नही चतुर्वेदी यांनी उपस्थित केला.

आता तर ती आरोपी डिझाईनर नसल्याच समोर आलं आहे. त्यामुळे या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करावी, त्यामुळे फडणवीसांनी गृहमंत्रीपदावरून बाजुला व्हावं, अशी मागणीही त्यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

ED : ‘ईडी’वर अंकुश! न्यायप्रविष्ट प्रकरणांत आता थेट अटक होणार नाही

Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण

Sugar : केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’; ९० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता

अग्रलेख : ‘आप’ भी...?

SCROLL FOR NEXT