महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांकडून मुंबईकरांचा विश्वासघात - अशोक चव्हाण

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - राज्यातले सरकार आणि स्वतःची खुर्ची वाचविण्यासाठी पारदर्शकतेचा मुद्दा गुंडाळून ठेवत महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांचा विश्वासघात केला आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी शनिवारी केली.

मुंबई महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीतून भाजपने माघार घेतल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. त्यांच्या या माघारीवर प्रतिक्रिया देताना चव्हाण म्हणाले, की सरकार वाचवण्यासाठी भाजपने पारदर्शकतेचा मुद्दा गुंडाळून ठेवला आहे. मुंबई महापालिका भ्रष्टाचारमुक्त करण्यापेक्षा राज्यातले सरकार वाचवणे ही प्राथमिकता असल्यानेच मुख्यमंत्र्यांनी आपली खुर्ची टिकवण्याला महत्त्व दिले आहे. शिवसेना, भाजप या दोन्ही पक्षांकडून प्रचारात झालेले आरोप- प्रत्यारोप हे फक्त मतदारांचे लक्ष विचलीत करण्यासाठी केलेले नाटक आहे, हे आमचे म्हणणे खरे ठरले तर आहेच; परंतु भाजप हा जनतेसाठी विश्वासघातकी पक्ष आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. "अच्छे दिन'च्या नावाने देशाची, 6500 कोटी रुपयांच्या नावाने कल्याण- डोंबिवलीकरांची आणि पारदर्शकतेच्या नावावर मुंबईकरांची फसवणूक भाजपने केली आहे, असे ते म्हणाले.

मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रचारात भाजप- शिवसेनेच्या नेत्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले होते. शिवसेना हप्तेखोरांचा पक्ष असून, मुंबई महापालिकेतून मिळणाऱ्या टक्केवारीवर शिवसेना चालते, अशी टीका भाजप नेत्यांनी केली होती. मग आता निवडणुकीतून माघार घेऊन या माफिया, हप्तेखोर, भ्रष्टाचारी लोकांच्या हातात मुंबईकरांना का सोपवले, याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांना द्यावे. गेल्या 22 वर्षांत शिवसेना- भाजप या दोन्ही पक्षांनी मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. यापुढेही राज्यात, केंद्रात आणि मुंबई महापालिकेत एकमेकांच्या सहकार्याने हे चालूच राहणार आहे, असे चव्हाण म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

Heeramandi The Diamond Bazar : भन्साळींच्या भाचीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; 'या' अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडेबोल

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT