Urfi Javed Chitra Wagh Sakal
महाराष्ट्र बातम्या

Urfi Javed Chitra Wagh : 'सासूबाईं'विरोधात उर्फीची तक्रार, रुपाली चाकणकरांना भेटणार

चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातलं वाक् युद्ध सध्या शिगेला पोहोचलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातला वाद सध्या विकोपाला गेला आहे. सातत्याने चित्रा वाघ यांना डिवचणाऱ्या उर्फी जावेदने आता महिला आयोगाकडे धाव घेतली आहे.

उर्फीने महिला आयोगाकडे भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात तक्रार केली आहे. तसंच तिने आपल्या वकिलांचा सल्लाही घेतला आहे. त्यांच्या सल्ल्यानुसार, आज उर्फी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना भेटायला जाणार आहे.

मॉडेल उर्फी जावेद हिच्या कपड्यांवरुन चित्रा वाघ यांनी टीका केली होती. तसंच तिच्यावर कारवाई करण्याची मागणीही चित्रा वाघ यांनी केली होती. त्यानंतर उर्फी जावेद सातत्याने ट्वीट करत चित्रा वाघ यांना डिवचत होती. चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाकडे उर्फीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसं पत्र त्यांनी पोलिसांनाही दिलं होतं.

हे प्रकरण महिला आयोगाकडे गेल्यावर महिला आयोगानेही उर्फीवर कारवाई करता येणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर चित्रा वाघ यांनी महिला आयोगावरही टीका केली होती. आता आज उर्फीने चित्रा वाघ यांच्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार अर्ज दिला असून वकिलांच्या सल्ल्यानुसार, ती रुपाली चाकणकरांची भेटही घेणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT