NCP Esakal
महाराष्ट्र बातम्या

NCP: डॅमेज कंट्रोलसाठी राष्ट्रवादीची तातडीची बैठक; भगीरत भालके आज हजारो समर्थकांसह करणार BRSमध्ये प्रवेश

भगीरथ भालके आज हजारो समर्थकांसह बीआरएसमध्ये प्रवेश करणार

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादीची साथ सोडत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील दिवंगत माजी आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके हे आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत. अशातच राष्ट्रवादीने पक्षातून कोणीही जाणार नसल्याचं सांगत भगीरथ भालके यांचं डिपॉजिट जप्त होईल असा दावा केलाय. (Latest Marathi News)

तर बीआरएस पक्षाचे सर्व आमदार, खासदार आणि मंत्र्यांना घेऊन मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे पंढरपूर मध्ये विठ्ठल दर्शनासाठी येत आहेत. यानंतर ते भालके यांच्या सरकोली येथील गावी सर्व ताफ्यासह जाणार असून त्यांच्या चार तासाच्या दौऱ्यातील तीन तास त्यांनी भालके यांच्यासाठी राखीव ठेवला आहे. (Latest Marathi News)

दिवंगत माजी आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना मानणारा मोठा वर्ग पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात आहे. त्यामुळे आज भगीरत भालके यांच्यासोबत हजारोच्या संख्येने पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते बीआरएस मध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा भालके समर्थक करत आहेत.(Latest Marathi News)

चंद्रशेखर राव आज सकाळी साडे दहा वाजता भालके यांच्या सरकोलीत पोचणार असून सुरुवातीला पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. तर तेलंगणाच्या सर्व पाहुण्यांना भालके यांच्याकडून खास महाराष्ट्रीय बेत जेवणासाठी तयार केला असल्याने केसीआर हे भालके यांच्या निवासस्थानी भोजन करून दुपारी दीड वाजता ते तुळजापूरला रवाना होणार आहेत .(Latest Marathi News)

तर भालके यांच्या बीआरएस मधील प्रवेशाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे धाबे दणाणले असून काल जिल्हाध्यक्ष काकासाहेब साठे, राज्य प्रवक्ते उमेश पाटील, अभिजित पाटील, कल्याणराव काळे, गणेश पाटील अशा दिग्गजांच्या उपस्थितीत डॅमेज कंट्रोलची बैठक घेण्यात आली. यानंतर बोलताना उमेश पाटील यांनी भालके यांच्यावर निशाणा साधताना भगीरथ हे वडील आमदार असताना त्यांच्याच गावातून जिल्हा परिषदेला पराभूत झालेले आहेत.(Latest Marathi News)

त्यांना पोटनिवडणुकीत पडलेली एक लाख पाच हजार मते राष्ट्रवादीची असल्याने ही मते आपल्या मागे असल्याचा भ्रम भालके यांनी करू नये असा टोला लगावला. भालके यांच्यासोबत राष्ट्रवादीचा कोणताही पदाधिकारी अथवा नेता बीआरएस मध्ये जाणार नसून सर्व पदाधिकारी , नेते बैठकीत हजर असल्याचा दावा उमेश पाटील यांनी केला . येत्या विधानसभेला भगीरथ भालके यांचे डिपॉजिट देखील राहणार नसल्याचा टोलाही उमेश पाटील यांनी लगावला आहे .(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT