Ujani Dam Water Sakal
महाराष्ट्र बातम्या

२० एप्रिलपर्यंत संपणार उजनीतील उपयुक्त साठा! सोलापूर शहरासाठी ९ एप्रिलपासून भीमा नदीतून पाणी; तर शेतीसाठी १५ एप्रिलपासून दुसरे आवर्तन

उजनी धरणातून १५ एप्रिलपासून शेतीसाठी दुसरे आवर्तन सोडले जाणार आहे. १५ एप्रिल ते २५ मेपर्यंत हे आवर्तन सुरू राहणार असून त्यासाठी साडेसात टीएमसी पाणी लागणार आहे. दुसरीकडे ९ एप्रिलपासून सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सोडले जाणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर : उजनी धरणातून १५ एप्रिलपासून शेतीसाठी दुसरे आवर्तन सोडले जाणार आहे. १५ एप्रिल ते २५ मेपर्यंत हे आवर्तन सुरू राहणार असून त्यासाठी साडेसात टीएमसी पाणी लागणार आहे. दुसरीकडे ९ एप्रिलपासून सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सोडले जाणार आहे.

सोलापूर शहराला प्रामुख्याने उजनी धरणातून आणि औज-चिंचपूर बंधाऱ्यातून पाणीपुरवठा होतो. कडक उन्हामुळे औज बंधाऱ्याने तळ गाठला असून सध्या बंधाऱ्यात १५ दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे. उजनीतून भीमा नदीत सोडलेले पाणी औज बंधाऱ्यापर्यंत पोचायला किमान १० दिवस लागतात, त्यामुळे ८ किंवा ९ एप्रिलपासून धरणातून भीमा नदीत पाणी सोडले जाणार आहे. त्यासाठी साधारणत: सहा टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे.

१५ एप्रिलपासून शेतीसाठी दुसरे आवर्तन सोडले जाणार असून त्या आवर्तनासाठी साडेसात टीएमसी पाणी सोडावे लागेल. या पार्श्वभूमीवर उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा संपणार असून २० एप्रिल दरम्यान धरण उणे पातळीत जाणार आहे. सध्या शेतीसाठी ६ मार्चला सोडलेले पहिले आवर्तन १४ एप्रिलपर्यंत चालणार आहे. त्यानंतर लगेचच दुसऱ्या आवर्तनाला सुरवात होईल. सध्या सीना-माढा, दहिगाव उपसा सिंचन योजना, कालवा, बोगद्यातून एकूण चार हजार २०० क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे.

उजनीतील पाणीसाठा

  • एकूण पाणीसाठा

  • ७७.४० टीएमसी

  • उपयुक्त पाणीसाठा

  • १३.७० टीएमसी

  • पाण्याची टक्केवारी

  • २५.६४ टक्के

  • सध्या सोडलेला विसर्ग

  • ४२०० क्युसेक

गतवर्षी धरण फेब्रुवारीतच उणे पातळीत

गतवर्षी उजनी धरणातील फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात उणे पातळीत गेले होते. पावसाळ्यापूर्वी धरण उणे ६० टक्के झाले होते. यंदा मात्र दिलासादायक स्थिती असून २० एप्रिलपर्यंत धरणात उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असणार आहे. धरण उणे पातळीत गेले तरीदेखील धरणात ६४ टीएमसी पाणी शिल्लक असणार आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत धरणात समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध राहणार असल्याने यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातीला तीव्र पाणीटंचाई जाणवणार नाही, अशी स्थिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT