prakash ambedkar
prakash ambedkar  esakal
महाराष्ट्र

Loksabha Election : ‘वंचित’ला तीनच जागा? आंबेडकरांशी तिन्ही पक्षांचे प्रमुख करणार चर्चा

मृणालिनी नानिवडेकर

मुंबई - वंचित बहुजन आघाडीला योग्य मान मिळत नसल्याची आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची तक्रार दूर करण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे त्यांची ४ किंवा ५ मार्च रोजी भेट घेणार आहेत. ‘वंचित’ने आम्ही ऐक्यासाठी तयार आहोत, मात्र लोकसभेसाठी केवळ तीन जागा देण्याचा प्रस्ताव मान्य कसा करावा, असा प्रश्न केला.

पंतप्रधान मोदींचा व भाजपचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व भाजपविरोधी पक्षांचे ऐक्य व्हावे, या उद्देशाने ही भेट होईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. प्रकाश आंबेडकर आज रामटेक परिसरातून ‘सकाळ’शी बोलताना म्हणाले,‘‘चर्चेतून मार्ग निघेल. जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून मोदी यांच्याविरोधात आमच्याकडे पर्याय म्हणून जनता बघते आहे.’

अकोला, छत्रपती संभाजीनगर आणि आणखी एखादी जागा अशा तीन जागा वंचितला देण्याची तयारी मविआने दाखवली आहे, अशी चर्चा आहे. वंचितला हा आकडा मान्य नाही, मात्र किती जागा द्यायच्या याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही तर निर्णय होण्याचा प्रश्न येतोच कुठे असा प्रश्न मविआने केला.

आज चर्चेतून मार्ग काढण्यासाठी शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी बैठक झाली. राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनीही माढा आणि परभणी या जागा मागितल्या असल्याचे सांगितले. आज जागावाटप चर्चेदरम्यान पश्चिम महाराष्ट्रात एकही जागा मिळेना अशी अवस्था असल्यावर आम्ही मग प्रचाराला तरी का यावे, अशी कडक विचारणा ठाकरे गटाने केल्याचे सांगण्यात येत होते.

राज्यात ८ ते १५ जागांबाबत वाद?

राज्यातील ८ ते १५ जागांबाबत अद्याप वाद आहे, असेही समजते. काहींनी ठाकरे गट २१ तर काँग्रेस १५ जागा लढणार यावर जवळपास एकमत झाले आहे, असा दावा केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार ९ जागा लढेल आणि ३ जागा इतरांना सोडल्या जातील, असे सांगितले. मात्र, याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: मतदानाचा टक्का का कमी होतोय?, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण! निवडणूक आयोगाला दाखवला आरसा

Aadesh Bandekar: पवईतील मतदान केंद्रातील EVM मशीन बंद; आदेश बांदेकर 3 तास रांगेत उभे, मतदार संतापले

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अमिर खान, किरण राय यांनी बजावला मतदानाचा हक्क

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का जास्त; दुपारी 1 पर्यंत झाले 29.88 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

SCROLL FOR NEXT