vedanta foxconn report talegaon is more suitable for vedanta foxconn project than dholera in gujarat
vedanta foxconn report talegaon is more suitable for vedanta foxconn project than dholera in gujarat  sakal
महाराष्ट्र

गुजरातच्या ढोलेरापेक्षा तळेगाव हे ठिकाण योग्य? अहवालाचा फोटो होतोय व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : वेदांचा-फॉक्सकॉन ग्रुपचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्याने सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेचे तापले आहे, विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर याबाबत जोरदार टीका केली जात आहेत. या प्रकल्पातून तब्बल एक लाख नोकऱ्या उपलब्ध होणार होत्या असे सांगितले जात आहे दरम्यानहा प्रकल्प गुजरातला जाणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप केले जात आहेत, यादरम्यान या प्रकल्पासंबंधी काही महत्वाची माहिती समोर आली आहे.

प्रकल्प गुजरातमध्ये का गेला?

फॅाक्सकॅान-वेदांताच्या सेमिकंडकटर बनवण्याचा प्रकल्पासाठी गुजरातमधील ढोलेरापेक्षा तळेगाव हे योग्य ठिकाण होतं. तरीही प्रकल्प गुजरातमध्ये का गेला हे मोठं कोडं असल्याचे बोलले जात आहे. यातच मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्रातील तळेगाव हे ठिकाणच वेदांचा-फॉक्सकॉन प्रकल्पासाठी योग्य असल्याची माहिती समोर आली आहे. वेदांचा फॉक्सकॉनच्या अहवालातून अशी माहिती समोर आली आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत काही महिन्यांपूर्वी सर्व्हे केला होता ज्यामध्ये गुजरातमधील ढोलेराची साईट प्रकल्पासाठी योग्य नसल्याचा उल्लेख करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान गुजरात सेमी कंडक्शन धोरण असलेलं एकमेव राज्य असल्यामुळेच कंपनीने गुजरातची निवड केल्याते बोलले जात आहे. गुजरातने सेमी कंडक्शन धोरण बनवले असून असे धोरण असणारे ते एकमेव राज्य आहेत. या धोरणाअंतर्गत गुंतवणूक यावी म्हणून स्टेट इलेक्ट्रॉनिक मिशन स्थापन करण्यात आलेले आहे. या अंतर्गत येणाऱ्या कंपन्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांना राज्याच्या बजेटमध्ये मान्यता दिली जाते, यामुळे सेमी कंडक्टर बनवणाऱ्या कंपन्या गुजरातला प्राधान्य देतात.

अहवालात काय म्हटलंय?

सोशल मिडीयावर वेदांता- फॉक्सकॉन प्रकल्पासाठी गुजरातमधील 'ढोलेरा'पेक्षा महाराष्ट्रातील तळेगाव हे योग्य ठिकाण होतं याबद्दल वेदांता फॉक्सकॉनच्या कथित अहवालाचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये दोन्ही ठिकाणांची तुलना केल्याचे दिसून येत आहे. या फोटोमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार तळेगाव हे ढोलेरापेक्षा सर्वच बाबतीत उजवे असल्याचे दिसून येत आहे. वीज आणि पाणी, मणुष्यबळाची उपलब्धता, ग्राहकांची उपलब्धता तसेच जमीन, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांची देखील तुलना यामध्ये केल्याचे दिसून येत आहे. यावरून तळेगाव हे अधिक चांगला पर्याय असल्याचे स्पष्ट होत आहे.

मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मंगळवारी रात्री फोनवरून संवाद साधला होता, तसेच एकनाथ शिंदे यांनी वेदांता आणि फॉक्सकॉन यांचा महाराष्ट्रात येणारा प्रकल्प अचानक गुजरातला कसा गेला, तो राज्याला का मिळू शकला नाही यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. शिवसेना-भाजप युतीचे नवे सरकार स्थापन होऊन दोनच महिने झाले आहेत. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर वेदांताचे मालक अनिल अग्रवाल, फॉक्सकॉन आणि केपीएमजी यांच्यासोबत एक बैठक घेतली होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते. यावेळी सरकारकडून ज्या काही सवलती देणे शक्य आहे, त्या सर्व दिल्या जातील असे सांगण्यात आले होते असे त्यांनी सांगितले आहे.

तसेच, तळेगावजवळील ११०० एकर जमीनही देण्यात आली होती. ३० ते ३५ हजार कोटींची सवलतीसह सब्सिडी, अन्य बाबी सरकारच्यावतीने ऑफर करण्यात आल्या होत्या. या प्रकल्पासाठी गेल्या दोन वर्षात जो रिस्पॉन्स मिळायला हवा होता, ते कमी पडला असावा. मात्र, नवीन सरकारकडून शक्य तितक्या सर्व सवलती आम्ही देऊ केल्या होत्या. असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. तसेच राज्यात नवीन प्रकल्प आणण्याबाबत आमचे सरकार नक्कीच प्रयत्न करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT