mantralay sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! २७ लाख अपात्र लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू; अंगणवाडी सेविका घरोघरी; पुढच्या टप्प्यात ‘या’ निकषाची पडताळणी, ५० लाख महिला ठरतील अपात्र, वाचा...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीनंतर राज्यातील ४२ लाखांवर महिला अपात्र ठरल्या आहेत. त्या सर्वांच्या याद्या प्रत्येक जिल्ह्यास पाठवून अंगणवाडी सेविकांमार्फत त्यांची पडताळणी सुरू केली आहे. त्यात २१ पेक्षा कमी आणि ६५ पेक्षा जास्त वयोगटातील महिला व एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी महिला आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीनंतर राज्यातील ४२ लाखांवर महिला अपात्र ठरल्या आहेत. त्यात माहिती व तंत्रज्ञान विभागाकडील माहितीतील २६ लाख ३४ हजार महिला आहेत. त्या सर्वांच्या याद्या प्रत्येक जिल्ह्यास पाठवून अंगणवाडी सेविकांमार्फत त्यांची पडताळणी सुरू केली आहे. त्यात २१ पेक्षा कमी आणि ६५ पेक्षा जास्त वयोगटातील महिला व एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी महिला आहेत.

लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातून दोन कोटी ५९ लाख महिलांचे अर्ज आले. त्यामुळे दरवर्षी लाडक्या बहिणींसाठी ५४ हजार कोटी रुपये लागतील, असे शासनाकडून सुरवातीला स्पष्ट करण्यात आले. तरीपण, २०२५- २६ च्या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींसाठी ३६ हजार कोटींची तरतूद करण्यात आली. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर लाडक्या बहिणींची निकषांच्या आधारे पडताळणी सुरू झाली.

सुरवातीला चारचाकी वाहन असलेल्यांची तपासणी झाली. त्यानंतर संजय गांधी निराधार योजना, नमो शेतकरी महासन्मान योजना, याशिवाय शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ घेणाऱ्यांची पडताळणी झाली. सरकारी नोकरदार महिला, बोगस पुरूष लाभार्थींचीही पडताळणी झाली. आता माहिती व तंत्रज्ञान विभागाकडील माहितीवरून वयोगट व एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थींची तपासणी सुरू आहे. त्यानंतर २६ लाख ३४ हजार लाडक्या बहिणींचा लाभ कायमचा बंद केला जाणार आहे.

आजपासून पडताळणी सुरू

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी २१ ते ६५ वयोगटातील महिला पात्र आहे. तरीदेखील २१ पेक्षा कमी व ६५ पेक्षा जास्त वय असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील १६ हजार ७८ आणि एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त ८३ हजार ७२२ महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांच्या याद्या प्राप्त झाल्या असून त्यानुसार आता अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी सुरू केली आहे.

- रमेश काटकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सोलापूर

‘आयकर’च्या माहितीवरून ५० लाख महिला अपात्र?

लाडकी बहीण योजनेत धनाढ्य विशेषत: कुटुंबाचे वार्षिक अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, अशा महिला देखील आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने इन्कम टॅक्स विभागाला यापूर्वीच पत्रव्यवहार केला आहे. राज्यातील अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या कुटुंबांची यादी मागितली आहे. त्यानुसार लाडकी बहीण योजनेतील आणखी अंदाजे ५० लाखांवर महिला अपात्र ठरतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.

लाडकी बहीण योजनेची सद्य:स्थिती

  • एकूण लाभार्थी

  • २.५९ कोटी

  • सुरवातीचा दरमहा निधी

  • ३,८५५ कोटी

  • पडताळणीत अपात्र लाभार्थी

  • ४२.२८ लाख

  • आता दरमहा लागणारा निधी

  • ३,२२५ कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar : ''...त्यावेळी आज आपणच पेरलेल्या विषाची जाणीव त्यांना होईल, पण वेळ मात्र गेलेली असेल''

ENG vs IND: टीम इंडियाने बुमराहशिवाय दोन्ही कसोटी जिंकल्या! सचिन तेंडुलकर म्हणाला, 'त्याने सुरुवात चांगली...'

Trump Tariff India Response: ट्रम्प यांच्या अतिरिक्त टॅरिफवर आता भारतानेही स्पष्ट केली भूमिका अन् दिलं सडेतोड प्रत्युत्तर!

Tutari Express: तुतारी एक्स्प्रेसमुळे प्रवाशांचा खोळंबा, वेळापत्रकात बदल करण्याची मागणी

Virar News : अर्नाळा किनाऱ्यावरील जीवरक्षकांनी वाचवले आठ जणांचे प्राण; माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी केला जीवरक्षकांचा सत्कार

SCROLL FOR NEXT