Crime
Crime Sakal
महाराष्ट्र

अंद्धश्रद्धेचा बळी! आईबापानेच केली पोटच्या मुलीची बेल्टने मारहाण करत हत्या

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : नागपूर मध्ये अंद्धश्रद्धेच्या आहारी जात अवघ्या सहा वर्षाच्या मुलीची तिच्या आईवडिलांकडून हत्या करण्यात आली आहे. भूतबाधा झाल्याच्या संशयातून एका भोंदूबाबाने दिलेल्या सल्ल्यानुसार आपल्या पोटच्या मुलीची हत्या केल्याच्या घटनेने नागपूरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी आईवडिलांना अटक केली आहे.

नागपूरच्या सुभाषनगर भागात ही घटना घडली असून मागील काही दिवसांपासून तिच्या हावभावात बदल दिसून आल्यामुळे भोंदूबाबाकडून सल्ला घेण्यात आला होता. त्यानंतर तिला परवा रात्री जबर मारहाण करण्यात आली होती. लाथाबुक्क्या आणि बेल्टने मारल्यामुळे चिमुकलीला मार सहन न झाल्यामुळे ती निपचित पडली होती. त्यानंतर आईवडिलांनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. पण हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.

या घटनंतर पोलिसांनी सदर घटनेतील आरोपी असलेल्या आईवडिलांना आणि तिच्या मावशीला ताब्यात घेत अटक केली आहे. त्यानंतर सल्ला देणाऱ्या भोंदूबाबाचा शोध सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

अंधश्रद्धेचं भूत मानेवर बसलं की काय होऊ शकत याची अजून एक प्रचिती आली असून आपल्या मुलीला भूतबाधा झाल्याचा संशय एका निष्पाप मुलीच्या जिवावर बेतलं आहे. ग्रामीण भागात घडणाऱ्या अंद्धश्रद्धेच्या घटना शहरी भागातही सर्रासपणे घडताना दिसत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajiv Gandhi : राजीव गांधींच्या हत्येबाबत इस्रायलने आधीच दिली होती सूचना, नंतर महत्त्वाचे दस्तावेज गायब; एक्स्पर्टचा दावा

CCF Tea For Thyroid : Thyroid वर मात करायची असेल तर CCF चा हेल्दी चहा प्या, नक्की फरक पडेल

Fake Deepfake's : खऱ्या किंवा एडिटेड व्हिडीओजना लावलं जातंय 'डीपफेक' चं लेबल

Lok Sabha Poll 2024 : ठाकरे गटाचा आणखी एक उमेदवार रिंगणात ? माजी महापौर रमेश म्हात्रे यांनी भरला उमेदवारी अर्ज

Jalgaon News : अपघातातील जखमीला उपचारासाठी न नेता दिले दरीत टाकून; आरोपी मालवाहू पिकप चालकास अटक

SCROLL FOR NEXT