Vidhan Sabha Election sakal
महाराष्ट्र बातम्या

Vidhan Sabha Election : कॉँग्रेसचा मुंबईत बैठकांचा सपाटा ;विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा घेणार

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला येत्या शुक्रवारी (ता.१९) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या मुंबईत बैठका होणार अाहेत.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला येत्या शुक्रवारी (ता.१९) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या मुंबईत बैठका होणार अाहेत.

काँग्रेस नेते, पदाधिकारी, खासदार आमदारांनाही ते मार्गदर्शन करणार आहेत. याच बैठकीत विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या फुटलेल्या आमदारांबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली व के.सी. वेणुगोपाल व प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या उपस्थितीत सकाळी १० वा. गरवारे क्लब येथे बैठक होणार असून काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

त्यानंतर काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे दुपारी दोन वाजता राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा प्रभारी, खासदार, आमदार, आघाडी संघटनांचे प्रमुख यांची संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीत विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा घेतला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Prediction : सोने १ लाख २५ हजारांवर पोहोचणार?, जून महिन्यात ८.२८ टक्क्यांनी दरात घसरण; तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज

Latest Marathi News Update : पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते

Success Story: दिवसा मोलमजुरी, पहाटे घाटरस्त्यावर धावण्याचा सराव; विकास काळेची प्रेरणादायी पोलिस भरारी, घर नाही, क्लास नाही... पण जिद्द होती..

Mhada Lottey : म्हाडाची लॉटरी रखडली, सोडत लांबल्याने अर्जदारांची आर्थिक ओढाताण

Pune: उरुळी कांचन येथे "कृषि विभागाच्या विविध योजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन मेळावा

SCROLL FOR NEXT