Rahul Narvekar Latest Marathi News  
महाराष्ट्र बातम्या

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अचानक लंडन दौऱ्यावर; तर झिरवळ म्हणतात, मी आमदारांना अपात्र करेन!

संतोष कानडे

मुंबईः राज्याच्या राजकारणात नेमकं काय सुरुय, हे नक्की कुणालाच सांगता येणार नाही. परंतु पडद्याआड काहीतरी नक्की सुरु आहे. आता अचानकपणे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर लंडन दौऱ्यावर जात असल्याची माहिती पुढे येत आहे.

सत्तासंघर्षाचा निकाल कधीही येऊ शकतो. अशा परिस्थितीत ९ ते १५ मे दरम्यान नार्वेकर लंडन दौऱ्यावर जात आहेत. उद्या रात्री ते मुंबईतून निघणार आहेत. तर १५ तारखेला माघारी येत आहेत. एका कॉन्फरन्ससाठी ते जात असल्याचं सांगितलं जात आहे.

राज्यात मागील काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. अजित पवार भाजपसोबत जाणार, असं बोललं जात असतांनाच शरद पवारांनी निवृत्ती जाहीर केली आणि माघारीही घेतली. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीतही तू-तू, मैं-मैं सुरु झालेलं आहे.

महत्त्वाचं म्हणजे सत्तासंघर्षाचा निकाल येत्या दोन-तीन दिवसांमध्ये येऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. असं असतांना राहुल नार्वेकर लंडन दौऱ्यावर जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 'एबीपी माझा'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

आमदारांचं प्रकरण माझ्याकडे आल्यास मी त्यांना अपात्र करेन- नरहरी झिरवळ

नरहरी झिरवळ यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय नेत्यासह सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून आता सर्व लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लागलं आहे. नरहरी झिरवळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना आमादारांना अपात्र करण्यचा मुद्दा उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : सूर्यकुमार यादवसाठी दरवाजे अजूनही खुले... माजी कर्णधाराचे टीम इंडियात पुनरागमन शक्य... जाणून घ्या, कसं!

RBI News: WhatsApp वर RBI चा मेसेज आला? खिशातील रुपया आता मोबाईलमध्ये! डिजिटल रुपया म्हणजे काय आणि तो कसा वापरायचा जाणून घ्या

IND vs ENG 1st ODI: भारत-इंग्लंड सामन्याची वेळ काय?... जाणून घ्या कधी, कुठे अन् कोणत्या चॅनेलवर पाहाल फ्री LIVE मॅच...

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय पेरांबूरला भेट देत आहेत

IND vs ENG: 'Lords' वर देव! भारतीय महिला खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी पोहोचला सचिन तेंडुलकर Video

SCROLL FOR NEXT