Vidyarthi Sahayyak Samiti  sakal
महाराष्ट्र बातम्या

Vidyarthi Sahayyak Samiti : विद्यार्थी साहाय्यक समितीला पाच कोटी रुपयांची देणगी;प्रतापराव पवार यांच्याकडून संस्थेला मदत

एखादी व्यक्ती पन्नास वर्षे संस्थेचे प्रमुख म्हणून संबंधित राहते, त्या संस्थेत कुटुंबाप्रमाणे एकोप्याचे वातावरण तयार करते, संस्थापकाची ध्येय - धोरणे आणि तत्त्वे यांचे काटेकोर पालन करत संस्थेला एका उंचीवर नेते आणि एवढ्यावरच न थांबता वैयक्तिक देणगी देऊन संस्थेच्या प्रगतीसाठी हातभार लावते ही गोष्ट दुर्मिळ अशी म्हणावी लागेल.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : एखादी व्यक्ती पन्नास वर्षे संस्थेचे प्रमुख म्हणून संबंधित राहते, त्या संस्थेत कुटुंबाप्रमाणे एकोप्याचे वातावरण तयार करते, संस्थापकाची ध्येय - धोरणे आणि तत्त्वे यांचे काटेकोर पालन करत संस्थेला एका उंचीवर नेते आणि एवढ्यावरच न थांबता वैयक्तिक देणगी देऊन संस्थेच्या प्रगतीसाठी हातभार लावते ही गोष्ट दुर्मिळ अशी म्हणावी लागेल. विद्यार्थी साहाय्यक समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी समितीला पाच कोटी रुपयांची देणगी देवून हा वस्तुपाठ घालून दिला आहे.

देणगीचा धनादेश आणि सोबत एक पत्र लिहून विश्वस्त मंडळाला त्यांनी प्रस्ताव दिला आहे. ‘‘आपण सर्वजण, कार्यकर्ते, माजी विद्यार्थी या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांतून समिती प्रगतीचा एक एक टप्पा पुढे जात आहे. देणगीदार आणि हितचिंतकांच्या मनात समितीबद्दलचा विश्वास दृढ आहे. गेल्या दोन वर्षांपासून समितीचा उद्योजकता उपक्रम, पहिल्यांदाच पुण्याबाहेर सुरू होत असलेली वसतिगृहे, सेक्शन ८ कंपनी स्थापनेचा विचार अशा सर्वच प्रयत्नांतून समितीच्या कामाचा परीघ विस्तारतो आहे. याचा आनंद होत असतानाच माझे वैयक्तिक योगदान म्हणून ही देणगी समितीला देऊ इच्छितो,’’ असे प्रतापराव पवार यांनी यांनी पत्रात म्हटले आहे.

‘‘ही देणगी कॉर्पस फंडात ठेवून, मिळणाऱ्या व्याजातील १५ टक्के रक्कम संस्थेने व्यवस्थापकीय खर्चासाठी वापरावी. ८५ टक्के रक्कम समितीच्या उद्दिष्टांसाठी प्राधान्याने खर्च करावी, त्यातून पैसे शिल्लक राहिल्यास समाजात अनेक गरजू लोकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या व्यक्ती- संस्था आहेत. त्यांना योग्य ती मदत करावी. यामुळे समितीचे काम मर्यादित न राहता व्यापक व्हावे आणि समाजाला त्याचा उपयोग व्हावा, त्यांना प्रेरणा मिळावी असा हेतू आहे,’’ असेही मत त्यांनी नोंदविले आहे.

‘‘आपण समाजाचे काही देणे लागतो, हा माझ्या आई - वडिलांकडून मिळालेला संस्कार मी आजवर आचरणात आणला आहे, त्याचाच हा एक भाग असल्याचे मी मानतो,’’ असेही त्यांनी नमूद केले आहे. समितीच्या विश्वस्त सदस्यांनी कृतज्ञतापूर्वक या देणगीचा स्वीकार करून प्रतापरावांबद्दल आदर अजून दुणावत असल्याची भावना व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT