Virar Murder sakal
महाराष्ट्र बातम्या

Virar Murder: विरारमध्ये खुनाचे सत्र सुरुच, अनैतिक प्रेम संबंधातून महिलेची हत्या!

Mumbai Crime: वसईतील हद्दीचे प्रकरण ताजे असतानाच आता विरार पूर्व फुलपाडा येथे अनैतिक संबंधातून हत्या झाल्याची घटना घडली आहे

सकाळ वृत्तसेवा

Boling Latest Update: विरार पूर्व येथे सोमवारी २४ जून संध्याकाळी महिलेची हत्या करण्यात आलेली आहे. अनैतिक प्रेम संबंधातून प्रियकराने विवाहित महिलेची हत्या केल्याची घटना घडली आहे. धनश्री अंबडस्कर (३२) असे मृत महिलेचे नाव असून ती विरार पूर्वेला फुलपाडा येथे राहत होती.

वसईतील हद्दीचे प्रकरण ताजे असतानाच आता विरार पूर्व फुलपाडा येथे अनैतिक संबंधातून हत्या झाल्याची घटना घडली आहे. धनश्री अंबडस्कर ही आपल्या पती व मुली सोबत राहत होती.

तर आरोपी शेखर कदम यांच्यासोबत महिलेचे अनैतिक संबंध होते. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या संबंधाबाबत पतीला कळल्यानंतर पती रामचंद्र अंबडस्कर याने महिलेला शेखर यास भेटण्यास नकार दिला होता त्यावर शेखरने महिलेच्या पतीला धमकावले होते. याबाबत महिलेच्या पतीने तक्रार नोंदवली होती.

सोमवारी सकाळी पती रामचंद्र अंबडस्कर कामावर गेला शेजाऱ्याने रामचंद्र अंबडस्कर याला फोन करून पत्नीची तब्येत गंभीर असल्याचे सांगून बोलावून घेतलं घरी येताच महिला मृत अवस्थेत आढळली. उपचारासाठी रुग्णालयात न्हेल्या नंतर तिला मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी याबाबत माहिती घेतल्या नंतर संध्याकाळी आरोपी शेखर कदम हा घरी आला असल्याचे माहिती रामचंद्र अंबडस्कर यांच्या शेजाऱ्यांनी दिली.

आरोपी शेखर कदम ह्याला घरातून बाहेर निघताना शेजाराने पाहिल्यानंतर धनश्री अंबडस्कर हिला चक्कर आली असून ती घरात बेशुद्ध आहे असं म्हणत शेखर तिथून फरार झाला. आरोपी विरोधात विरार पोलीस ठाण्यात ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT