advocate solapur
महाराष्ट्र बातम्या

‘महाराष्ट्र-गोवा बार’साठी २४ मार्चला मतदान; १५५ उमेदवार, १.८० लाख मतदार, निवडणुकीत सोलापूरचे सात उमेदवार; मतदान कसे होते? वाचा...

महाराष्ट्र-गोवा बार असोसिएशनच्या निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरू असून २३ सदस्यांच्या निवडीसाठी २४ मार्च रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत तब्बल १५५ उमेदवार रिंगणात असून त्यात सोलापूर शहर व जिल्ह्यातील सात उमेदवारांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी सुमारे एक लाख ८० हजार वकिल मतदार आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : महाराष्ट्र-गोवा बार असोसिएशनच्या निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरू असून २३ सदस्यांच्या निवडीसाठी २४ मार्च रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत तब्बल १५५ उमेदवार रिंगणात असून त्यात सोलापूर शहर व जिल्ह्यातील सात उमेदवारांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी सुमारे एक लाख ८० हजार वकिल मतदार आहेत.

२३ सदस्यांपैकी पाच जागा महिलांसाठी राखीव असून १५५ उमेदवारांमध्ये ४५ महिला उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. मतदानासाठी आता अवघे काही दिवस उरले असून उमेदवारांना राज्यभरातील वकिल मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जोरदार प्रचार करावा लागत आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह गोव्यातील वकिलांनाही आपल्याला मतदान का करावे, हे पटवून देण्याचे आव्हान उमेदवारांसमोर आहे.

सोलापूरमधील प्रसिद्ध क्रिमिनल लॉयर मिलिंद थोबडे हेही पुन्हा एकदा या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यापूर्वी त्यांना महाराष्ट्र-गोवा बार असोसिएशनमध्ये काम करण्याची संधी मिळाली असून पुन्हा विजय मिळवण्याची त्यांना आशा आहे. आतापर्यंत त्यांनी महाराष्ट्रातील १४ हून अधिक जिल्ह्यांमध्ये प्रचार केला आहे. तसेच जिल्हा सरकारी वकील म्हणून दीर्घकाळ कार्य केलेले प्रदीपसिंग राजपूत यांची राज्यभर ख्याती आहे. त्यांच्या अचूक युक्तिवादामुळे न्यायालयाने १०० हून अधिक गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. माजी जिल्हा सरकारी वकील संतोष न्हावकर व हेमा शिंदे यांनीही विजयाबाबत विश्वास व्यक्त केला आहे. याशिवाय अन्य उमेदवारही प्रचारात व्यस्त आहेत.

निवडणुकीसाठी ‘हे’ आहेत सोलापूरचे उमेदवार

प्रसिद्ध विधिज्ञ मिलिंद थोबडे, जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत, माजी जिल्हा सरकारी वकील संतोष न्हावकर, हेमा शिंदे, ॲड. आसिम बांगी तसेच पंढरपूरचे ॲड. धनश्री घाडगे व ॲड. अमित कसबे हे सात उमेदवार महाराष्ट्र-गोवा बार असोसिएशनची निवडणूक लढवीत आहेत.

मतपत्रिकेवर मतदान; प्रत्येक तालुक्यात केंद्र

या निवडणुकीसाठी प्रत्येक तालुक्यातील बार असोसिएशनच्या ठिकाणी मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे. मतपत्रिकेद्वारे प्रत्येक वकिलाला मतदानाचा हक्क बजावता येणार असून पसंतीक्रमानुसार मते द्यावी लागतील. सोलापूर शहर व जिल्ह्यात साधारण पाच ते साडेपाच हजार मतदार आहेत. २४ मार्च रोजी महाराष्ट्र व गोवा येथे एकाचवेळी मतदान होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ए. आर. रहमान यांच्या मुलाचा अपघात; पहाटे 3 वाजता Porsche ची धडक

Marathi News Live Updates : जंतरमंतरवरील लाठीचार्जवर गृहमंत्री अमित शहा लोकसभेत निवदेन देण्यास तयार; विरोधकांचा आक्रमक पवित्रा

Blocked Nose: सर्दी नाही तरी रात्रीच्या वेळी नाक का बंद होते? जाणून घ्या कारण आणि सोपे उपाय!

Mumbai Train Disturb: मुलुंड स्टेशनमध्ये ट्रेनवर काहीतरी पडले; आग लागली.. धुरांचे लोट अन् मध्य रेल्वेची वाहतुक विस्कळीत Video

Bhudargad Fort Wall Collapse : अवघ्या 2 वर्षांत ऐतिहासिक भुदरगड किल्ल्याची 50 फूट लांबीची तटबंदी कोसळली; कोट्यवधींचा निधी पाण्यात, गडप्रेमींचा तीव्र संताप

SCROLL FOR NEXT