ajit pawar ajit pawar
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: "थोडे दिवस थांबा अजित पवार कुठे असतील ते समजेल", शिंदे गटाच्या आमदाराचं वक्तव्य

भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांवर शिंदे गटाच्या आमदाराचे मोठे वक्तव्य

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्यासंदर्भात राजकारणात जोरदार चर्चा तसेच तर्क-वितर्क लावले जात आहेत. शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार भारतीय जनता पक्षात जाणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यावर शरद पवार आणि अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं. मात्र त्यानंतर माध्यमांमधील चर्चा थांबत नसल्याचे दिसुन येत आहे. पुण्यात सकाळ समूहाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. त्यानंतर पुन्हा ही चर्चा सुरु झाली. त्यावर आता शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

थोडे दिवस थांबा अजित पवार कुठे असतील ही सर्वांनाच दिसेल असं वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलं आहे. आजितदादा शरीराने सभेला असतील मात्र मनाने नसतील असंही ते पुढे म्हणाले आहेत.

काय म्हणालेत संजय शिरसाट?

मला वाटतं आज सर्वात जास्त त्रास हा अजितदादांना होतं असेल. माझ्या माहितीप्रमाणे त्यांना कार्यक्रमात खुर्ची ठेवायची की नाही याबाबत संभ्रम होता. यापूर्वीही त्यांनी कमिटी निर्माण केली त्यामध्येही अजित पवारांचं नाव नव्हतं.ते शरीराने सभेत असतील पण मनातून असतील का ते? ते मनातून कुठे असेल ते 4 दिवसात कळेल, सगळ्यांना दिसेल. अजित दादा सगळे विषय हसून खेळून टोलवतात आहे, याचाच अर्थ त्यांच्या मनात काहीतरी आहे ते 100 टक्के निर्णय घेतील असंही ते पुढे म्हणाले आहेत.

तर पुढे बोलताना शिरसाट म्हणाले की, तीन पक्ष येऊन आज गर्दी करताय आणि आम्ही सोबत आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करत आहेत. सभेमुळे महाराष्ट्र कुणाच्या मागे ते कळत नाही, सभेमुळे वातावरण बदलते हा समज चुकीचा आहे, शिवसेना प्रमुख मला म्हणायचे गर्दी होते मग मतदान का मिळत नाही, त्यामुळं फार लक्ष द्यायची गरज नाही. सभेचा धुरळा उडणार नाही आणि थोडा बहुत उडाला तर आम्ही पाणी मारून शांत करू असंही संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

संजय शिरसाट यांच्या या विधानामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. अजित पवार भारतीय जनता पक्षात जाणार कि राष्ट्रवादीमध्येच राहणार या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. येत्या काही दिवसात चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT