chandrakant patil  Sakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापूरला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची प्रतीक्षाच! खासगी १४ महाविद्यालये, पण शासकीय कॉलेज एकही नाही; आजी-माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची नुसतीच ग्वाही

पुणे, कराड, रत्नागिरी, लातूर, कोल्हापूर अशा १० जिल्ह्यांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत, पण सोलापूर जिल्ह्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ असताना आणि याठिकाणी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्याची सात-आठ वर्षांपासून मागणी असताना देखील ते मिळू शकलेले नाही.

तात्या लांडगे

सोलापूर : पुणे, कराड, रत्नागिरी, लातूर, कोल्हापूर अशा १० जिल्ह्यांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत, पण सोलापूर जिल्ह्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ असताना आणि याठिकाणी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्याची सात-आठ वर्षांपासून मागणी असताना देखील ते मिळू शकलेले नाही.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला २० वर्षे पूर्ण झाली, त्याअंतर्गत १०९ महाविद्यालये संलग्नित असून त्यात १४ खासगी अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. सोलापूर जिल्ह्यातील या खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयातून दरवर्षी साडेचार ते पाच हजार विद्यार्थी शिक्षण पूर्ण करून बाहेर पडतात. प्रवेशाच्या स्पर्धेत गुण कमी पडलेल्या काही विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे अभियांत्रिकीचे शिक्षण घेता येत नाही किंवा दुसऱ्याच शाखेतून शिकावे लागते. तर काहींना व्याजाने पैसे काढून प्रवेश घ्यावा लागतो. या पार्श्वभूमीवर आमदार प्रणिती शिंदे यांनी तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे सतत पाठपुरावा केला, पण पुढे काहीच कार्यवाही झाली नाही. तंत्रनिकेतनच्या माजी विद्यार्थ्यांनी विद्यमान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडेही पाठपुरावा केला, ते सोलापूरचे पालकमंत्री असताना तशी ग्वाही देखील दिली होती.

पण, २०२४-२५ चे शैक्षणिक वर्ष सुरु होऊन आता संपत आले, तरीदेखील सोलापूरसाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मिळू शकलेले नाही. पुण्यातील त्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी म्हणतात, असा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे प्राप्त झालेला नाही. सोलापूरशी जिव्हाळ्याचे संबंध असलेले मंत्री येथील गोरगरीब मुलांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर करतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिष्यवृत्तीचे अर्ज भरले, महाविद्यालयांना निधीची प्रतीक्षा

जुलै-ऑगस्टमध्ये अभियांत्रिकीचे कॉलेज सुरु झाले, विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज ऑक्टोबरमध्ये भरून घ्यायला सुरवात झाली असून त्याची मुदत अजूनही आहे. उच्चशिक्षण मोफत केल्यानंतर हजारो मुलींना त्याचा फायदा झाला, पण सरकारकडून महाविद्यालयांना वेळेत ट्यूशन फी मिळत नसल्याने प्राध्यापकांच्या पगारी वेळेत करता येत नसल्याच्या अडचणी संस्था चालकांच्या आहेत. याशिवाय सर्वच मुलांसाठी मोफत उच्चशिक्षणाचा निर्णय नसल्याने गरीब कुटुंबातील मुलांना आर्थिक परिस्थितीमुळे इच्छा असूनही अभियांत्रिकीचे शिक्षण घेता येत नाही.

दोन्ही मंत्र्यांनी त्यांच्या जिल्ह्यासाठी महाविद्यालये घेतली, पण...

तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे वारंवार निवेदने देऊन सोलापूरसाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची मागणी केली. त्यांनी आश्वासन दिले, पण सोलापूरच्या रत्नागिरीला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु केले. विद्यमान मंत्र्यांनी कोल्हापूरसाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर करून घेतले. पण, सोलापूरकरांनी वारंवार संघर्ष करूनही सोलापूरसाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मिळू शकले नाही, पण त्याची गरज खूप आहे.

- मनोज गायकवाड, अध्यक्ष, शासकीय तंत्रनिकेतन बचाव कृती समिती, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT