Narendra Modi esakal
महाराष्ट्र बातम्या

PM Narendra Modi : पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याला काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा इशारा

सकाळ डिजिटल टीम

पुणेः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुरस्काराच्या निमित्ताने १ ऑगस्ट रोजी पुण्याच्या दौऱ्यावर येत आहे. परंतु त्यांच्या दौऱ्याला कडाडून विरोध होत असतांना दिसून येत आहे. मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारामुळे पंतप्रधानांना विरोध होत आहे.

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने पंतप्रधान मोदी १ ऑगस्टला पुणे दौऱ्यावर येणार आहेत. मात्र, मोदींच्या पुणे दौऱ्याला ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या नेतृत्वात विरोधी पक्ष व विविध संघटना विरोध करणार आहेत.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परदेशात जायला वेळ असतो मात्र त्यांना मणिपूरमध्ये जायला वेळ नाही. या मुद्द्यावरुन बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली विरोध पक्ष एकवटले असून पंतप्रधानांच्या दौऱ्याला काळे झेंडे दाखवण्यात येणार आहेत. इंडिया फ्रंट, पुणे यांच्या वतीने १ ऑगस्ट रोजी सकळी ११ वाजता आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय.

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही पुरस्कारावरुन मोदींना टार्गेट केलं. ''याआधी कुठल्याही पंतप्रधानांनी खासगी पुरस्कार स्वीकारलेला नाही. पंतप्रधान पदाची एक गरीमा असते, ती टिकवली पाहिजे. नरेंद्र मोदी म्हणून ते पुरस्कार स्वीकारत असतील तर वेगळी गोष्ट आहे. परंतु पंतप्रधान म्हणून त्यांनी पुरस्कार स्वीकारु नये, असं पटोले म्हणाले.''

इंडिया फ्रंटने दिलेल्या माहितीनुसार, विरोधी पक्षांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याचा १ तारखेला सकाळी ११ वाजता अलका चौकात काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात येणार आहे. तसेच पुणेकरांनी काळे कपडे घालून आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन इंडिया फ्रंटच्या वतीने करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Three Language Policy : सीबीएसईच्या सहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! त्रि-भाषा धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; काय दिले निर्देश?

Mumbai Indians ने कर्णधारासह ११ खेळाडूंना केलं रिटेन! फ्रँचायझीने संघाबाहेर केलेल्यांची यादीच जाहीर केली

DCM Sunetra Pawar : बारामती बँकेने कार्यक्षेत्र विस्तारुन आर्थिक सहाय्य करावे

El Nino Impact: अल निनोच्या कमी पावसाने रत्नागिरी, राजापूर, संगमेश्वरातील भातशेती कोलमडली; ३०-४० टक्के उत्पादन घटण्याचा अंदाज

DCM Sunetra Pawar : हारतुरे नको...मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करा

SCROLL FOR NEXT