Dam Water
Dam Water 
महाराष्ट्र

राज्यातील धरणे निम्म्यावर 

तात्या लांडगे

धरणांमध्ये 57 टक्‍केच पाणी : गतवर्षीच्या तुलनेत 18 टक्‍क्‍यांची घट 
सोलापूर - राज्यातील एकूण तीन हजार 266 मोठ्या, मध्यम व लघू प्रकल्पातील पाणीसाठा हिवाळ्यातील कडक उन्हामुळे घटत आहे. सद्यस्थितीत या प्रकल्पांत फक्‍त 57 टक्‍केच पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत 18 टक्‍क्‍यांची घट झाली असून अनेक बंधारे कोरडे पडल्याचे पाहण्यात येत आहे. 

मराठवाडा, नाशिक, पुणे व अमरावती विभागांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत मराठवाडा विभागातील धरणांमधील पाणीसाठा तब्बल 46 टक्‍क्‍यांनी घटला आहे. दुसरीकडे नाशिक विभागातील पाणीसाठ्यात 24 टक्‍क्‍यांनी तर पुणे विभाग 17 टक्‍के, अमरावती विभाग 14 टक्‍के, कोकण विभाग सात टक्‍के, नागपूर विभाग नऊ टक्‍के कमी झाला आहे. मान्सूनच्या सुरवातीला पडलेल्या पावसामुळे राज्यातील बहुतांश धरणात 100 टक्‍के पाणीसाठा होता. मात्र, दुष्काळाच्या तीव्रतेमुळे त्यात झपाट्याने घट झाली. त्याचा परिणाम रब्बीच्या पेरणीवर झाला असून राज्यात अद्यापपर्यंत फक्‍त 17 टक्‍केच रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत. दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी प्रत्येक घटकांनी उपलब्ध पाण्याचे नियोजन जनावरांच्या चाऱ्यासाठी व पिण्यासाठी करावे, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. 

प्रकल्पनिहाय पाणीसाठा (कंसात मागील वर्षीचा पाणीसाठा) 
मोठे प्रकल्प - 140 
पाणीसाठा - 62.58 टक्‍के (80.38) 
मध्यम प्रकल्प - 258     50.23 टक्‍के (70.07) 
लघू प्रकल्प - 37.71 टक्‍के (55.26) 

विभागनिहाय सध्याचा पाणीसाठा (कंसात मागील वर्षीची स्थिती) 
अमरावती - 54.90 टक्‍के (41) 
कोकण - 83.51 टक्‍के (90.81) 
नागपूर - 31.65 टक्‍के (40.83) 
नाशिक - 59.93 टक्‍के (84) 
पुणे - 74.63 टक्‍के (91.48) 
मराठवाडा - 23.14 टक्‍के (69.25)

हिवाळा असूनही वाढलेल्या कडक उन्हामुळे पाणीसाठा कमी होतोय. दुसरीकडे रब्बी पेरणीसाठी व जनावरांसाठी शेतकऱ्यांकडून तर पिण्यासाठी नागरिकांकडून पाण्याची मागणी वाढत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पाण्याचे काटेकोर नियोजन गरजेचे असून दुष्काळामुळे आगामी काळ कठीण आहे. 
- धीरज साठे, अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Home Loan: RBIने जाहीर केली गृहकर्जाची धक्कादायक आकडेवारी; गेल्या 2 वर्षात झाली 10 लाख कोटी रुपयांची वाढ

California Bridge : कुठेच न पोहोचणारा 11 बिलियन डॉलरचा पूल! कॅलिफोर्नियतला ब्रिज झाला चेष्टेचा विषय

Latest Marathi News Update : पुण्यात मेट्रोच्या प्रवाशांमध्ये वाढ, एप्रिलमध्ये दिवसाला सरासरी 80 हजार जणांचा प्रवास

Warren Buffett: गुंतवणुकीसाठी अमेरिका ही पहिली पसंती; भारताबाबत काय म्हणाले वॉरन बफे?

Murlidhar Mohol : वाहतूक सक्षमीकरणासाठी मेट्रोचा विस्तार ; मोहोळ यांचे आश्वासन,कोंडीची समस्या सुटण्यास होणार मदत

SCROLL FOR NEXT