Warren Buffett: गुंतवणुकीसाठी अमेरिका ही पहिली पसंती; भारताबद्दल काय म्हणाले वॉरन बफे?

Berkshire Hathaway: जगातील प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी शनिवारी त्यांच्या कंपनी बर्कशायर हॅथवे इंकचे पहिल्या तिमाहीचे (जानेवारी-मार्च) निकाल जाहीर केले. या काळात कंपनीच्या भागधारकांची वार्षिक बैठकही झाली.
Investor Warren Buffett Answers A Key Question About Indian Markets
Investor Warren Buffett Answers A Key Question About Indian Markets Sakal

Berkshire Hathaway: जगातील प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी शनिवारी त्यांच्या कंपनी बर्कशायर हॅथवे इंकचे पहिल्या तिमाहीचे (जानेवारी-मार्च) निकाल जाहीर केले. या काळात कंपनीच्या भागधारकांची वार्षिक बैठकही झाली. या तिमाहीत कंपनीने जबरदस्त कमाई केली आहे. या कालावधीत कंपनीच्या नफ्यात मागील वर्षाच्या तुलनेत 39 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या कालावधीत कंपनीला 92,719 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. या भेटीत वॉरन यांनी त्यांच्या आगामी गुंतवणुकीशी संबंधित मुद्देही मांडले.

वॉरन बफे यांना त्यांच्या आगामी गुंतवणूक योजनांबद्दल विचारले असता त्यांनी अमेरिकेला त्यांची पहिली पसंती दिली आहे. बफे म्हणाले की, त्यांच्या कंपनीला कोणतीही मोठी गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी अमेरिका ही पहिली पसंती असेल.

वॉरन यांनी यापूर्वीच अमेरिकेत मोठी गुंतवणूक केली आहे. अमेरिकेला पहिली पसंती का असेल, याबाबत बफे म्हणाले की, येथील कंपन्या खूप चांगल्या आहेत. ज्या अमेरिकन कंपन्यांचा व्यवसाय जगभर पसरला आहे, त्या अमेरिकन कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास त्यांची कंपनी प्राधान्य देते, असे ते म्हणाले.

Investor Warren Buffett Answers A Key Question About Indian Markets
Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

जपानमधील गुंतवणुकीबाबत समाधानी

जेव्हा बफे यांना विचारण्यात आले की त्यांनी जपानी कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीकडे आता त्यांचा कसा दृष्टिकोन आहे? याबाबत बफे म्हणाले की, जपानमधील गुंतवणुकीबाबत आपण समाधानी आहोत. बफे यांनी गतवर्षी 4 जपानी कंपन्यांमधील आपली हिस्सेदारी वाढवली होती.

त्यापैकी मारुबेनी, मित्सुई, मित्सुबिशी आणि सुमितोमो या प्रमुख कंपन्या आहेत. बफे यांनी चिनी कंपन्यांमध्येही गुंतवणूक केली आहे. 2008 मध्ये त्यांनी चीनी ऑटोमोबाईल कंपनी BYD मध्ये गुंतवणूक केली. बफे यांनी आता या कंपनीतील आपली हिस्सेदारी कमी केली आहे.

Investor Warren Buffett Answers A Key Question About Indian Markets
Home Loan: RBIने जाहीर केली गृहकर्जाची धक्कादायक आकडेवारी; गेल्या 2 वर्षात झाली इतक्या लाख कोटींची वाढ

भारताबाबत काय सांगितले?

वॉरन बफे यांनी भारतातील गुंतवणुकीबाबत आपले मत व्यक्त केले. त्यांना विचारण्यात आले की ते भविष्यात भारतात गुंतवणूक करण्याची शक्यता आहे का? त्याला उत्तर देताना ते म्हणाले की, भारतासारख्या देशात भरपूर संधी आहेत. ते म्हणाले की, सध्या त्यांची भारतात गुंतवणूक करण्याचा कोणताही विचार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com