Ujjani Dam sakal
महाराष्ट्र बातम्या

उजनीतील पाणी आता पिण्यासाठीच! पाणीपातळी २० टक्क्यांवर गेल्याने घटला कॅनॉलचा विसर्ग; २५ मेपूर्वी बंद होणार शेतीचे पाणी; महापालिका घेणार नाही भीमा नदीतून पाणी

१ मे रोजी उजनी धरण उणे १५ टक्के असताना कॅनॉलमधील विसर्ग २५४० क्युसेक इतका होता. आता धरण उणे २० टक्के झाल्याने कॅनॉलमधील विसर्ग १ हजार ९५० क्युसेकपर्यंत खाली आला आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : उजनी धरण उणे २८ टक्के होईपर्यंत डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सोडता येते. पण, धरण उणे १० टक्क्यांवर पोचताच पाण्याचा वेग कमी होतो. दरम्यान, १ मे रोजी उजनी धरण उणे १५ टक्के असताना कॅनॉलमधील विसर्ग २५४० क्युसेक इतका होता. आता धरण उणे २० टक्के झाल्याने कॅनॉलमधील विसर्ग १ हजार ९५० क्युसेकपर्यंत खाली आला आहे. शेतीसाठी उजनीतून सोडलेले पाणी २५ मेपूर्वीच बंद होणार आहे.

२९ डिसेंबर रोजी १०० टक्के भरलेले धरण सव्वाचार महिन्यातच उणे २० टक्क्यांवर पोचले आहे. शेतीसाठी उन्हाळ्यात सलग दोन आवर्तने सोडल्याने १७ एप्रिलला धरण उणे झाले. सध्या धरणात जरी ५२ टीएमसी पाणी असले तरी ते सगळेच पाणी वापरता येत नाही. त्यात गाळ २० टीएमसीपर्यंत आहे. बाष्पीभवनातूनही दीड ते दोन टीएमसी पाणी जाणार आहे. अवकाळीमुळे पाऊस लांबण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर २५ मे पूर्वी शेतीसाठी सोडलेले पाणी बंद करून त्यानंतर धरणातील पाणी पिण्यासाठीच राखीव ठेवले जाणार आहे. सध्या धरणावर ४२ योजना आणि १०० हून अधिक ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा अवलंबून आहे.

महापालिका घेणार नाही भीमा नदीतून पाणी

सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यात आता ७ जूनपर्यंत पुरेल इतके पाणी आहे. पण, मेअखेर सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सोडल्यास धरणाची पातळी १० टक्क्यांनी कमी होऊन धरण उणे ४५ टक्क्यांपर्यंत जाईल. त्यामुळे महापालिकेला दुबार पंपिंगसाठी एक कोटींचा खर्च करावा लागू शकतो. दुसरीकडे त्या आवर्तनासाठी महापालिकेला तीन कोटी रुपये जलसंपदा विभागाला द्यावे लागतात. या पार्श्वभूमीवर महापालिका आता भीमा नदीतून पाणी न घेता, समांतर जलवाहिनीतूनच पाणी घेणार आहे. त्यादृष्टीने नियोजन सुरू असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिली.

उजनी धरणाची सद्य:स्थिती

  • एकूण पाणी

  • ५२.४० टीएमसी

  • पाण्याची टक्केवारी

  • उणे २० टक्के

  • बोगद्यातून सोडलेला विसर्ग

  • २९० क्युसेक

  • कॅनॉलमधून सोडलेले पाणी

  • १९८० क्युसेक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT