Satej Patil and Shahu Maharaj 
महाराष्ट्र बातम्या

Kolhapur : शाहू महाराजांची इच्छा जाणून घ्यावी लागेल; कोल्हापूर लोकसभेबाबत सतेज पाटलांचं विधान

रवींद्र देशमुख

कोल्हापूर - देशपातळीवर इंडिया आघाडी स्थापन झाल्यापासून राज्यातही विरोधकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्यात आता लोकसभा मतदार संघांची चर्चा सुरू झाली असून कोल्हापूर लोकसभा मतदार संघाबाबतही चर्चा असून काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी याबाबत विधान केलं आहे.

सतेज पाटील म्हणाले की, कोल्हापूर लोकसभा मतदार संघासाठी तिन्ही पक्ष चाचपणी करत आहेत. वरिष्ठ पातळीवर याचा निर्णय होईल. कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचा खासदार करणं हेच आमचं ध्येय असणार आहे. राज्यातून ४० खासदार निवडून आले पाहिजे, ही आमची भूमिका असणार आहे. आमच्यात जागावाटपाबाबत कोणताही घोळ नाही, असंही ते म्हणाले. तसेच राज्यात आणि कोल्हापुरात वाद होणार नाही. आणखी निवडणुकीला ६ महिने बाकी असून काय-काय घडत ते बघत राहू.

कोल्हापुरात १० कोटी रुपयांचं पहिलं इंडोअर स्टेडियम होणार होतं. त्याला खासदार धनंजय महाडिकांनी स्थगिती आणण्याच काम केल्याची माहिती आहे. ही माहिती खरी-खोटी मला माहित नाही. त्यांनी खुलासा करणं आवश्यक आहे. मात्र इनडोअर स्टेडियम रद्द करणं हे पाप आहे. हा खेळाडूंवर अन्याय असल्याचं पाटील यांनी नमूद केलं.

लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीबाबत सतेज पाटील म्हणाले की, श्रीमंत शाहु महाराजांविषयी आम्हाला आदरच आहे. परंतु, त्यांची स्वत:ची इच्छा काय, याबाबत त्यांच्याशी चर्चा झालेली नाही. मात्र कोल्हापूरमधून पुरागामी विचारांचा महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून यावा हीच आमची इच्छा असल्याचं सतेज पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एकतर्फी निकाल की धक्कादायक उलथापालथ? काँग्रेसच्या तटस्थ भूमिकेचा फायदा कुणाला? अमरावती विधानपरिषदेचा आज फैसला

आजचे राशिभविष्य - २२ जून २०२६

Industrial Pollution : कुरकुंभ एमआयडीसीतील ‘हार्मनी ऑर्गेनिक्स’वर प्रदूषण प्रकरणी कडक कारवाई; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून उत्पादन तत्काळ बंद करण्याचे आदेश

उत्तम गुंतवणूक : निफ्टी इंडिया डिफेन्स निर्देशांक : गुंतवणुकीची आकर्षक संधी

Pune Traffic: बाबा भिडे पूल २२ जून ते ६ जुलैपर्यंत पूर्ण बंद; डेक्कन मेट्रो पादचारी केबल पुलाच्या कामासाठी वाहतूक बदल, पर्यायी मार्ग जाहीर

SCROLL FOR NEXT