Maharashtra Weather Updates  sakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update : बरसो रे मेघा! मुंबई, पुण्यासह राज्यातील 'या' भागांत अतिमुसळधार पावसाचा इशारा

आज मुंबई, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यासह देशभरात मान्सूनला दमदार सुरूवात झाली असून येत्या 48 तासात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.(Latest Marathi News)

पुढील 48 तासांत मुंबई, ठाणे, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या स्थितीमुळे मोसमी पावसाचा जोर आणखी वाढला आहे. हवामान विभागाने 27 आणि 28 जून रोजी विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.(Latest Marathi News)

तर मुंबईत आजपासून 2 दिवस मुसळधार अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मंगळवारी मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून बुधवारी यलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय राज्याच्या इतरही काही भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे(Latest Marathi News)

यात नाशिक, पुणे, पालघर, ठाणे, सातारा, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्येही आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज/यलो अलर्ट जारी केला आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

आमिर खान यांना 'सितारे ज़मीन पर' च्या प्रचंड यशानिमित्त देशभरातील एग्झिबिटर्सकडून विशेष सन्मान!

कॅन्सरग्रस्त दीपिका कक्करला भेटायला पोहोचली मराठमोळी सोनाली कुलकर्णी; दोघींचा नेमकं नातं काय?

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

SCROLL FOR NEXT