Maharashtra Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Weather Update : पुणे, मुंबईसह राज्याच्या 'या' भागांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता; विभागाकडून हायअलर्ट

Maharashtra Weather Update : राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात मान्सून सक्रिय झालं आहे. आजही राज्यात अनेक भागात मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात मान्सून सक्रिय झालं आहे. आजही राज्यात अनेक भागात मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज कोकणासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

आज कोकणासह, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छ. संभाजीनगर आणि जालना वगळता आज संपूर्ण राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदूर्गमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबई, पुणे, सोलापूर आणि आतर जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.

काल (सोमवारी) रात्री उशिरापर्यंत मान्सूनने अर्धा महाराष्ट्र गाठला असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्राला व्यापणार, असा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, राज्यातील अनेक भागात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात पावसाची दमदार हजेरी

राज्यात १ ते १० जून दरम्यान सरासरी २०.१ मिलिमीटर पाऊस पडतो. यातील बहुतांश पाऊस पूर्वमोसमी असतो. १० ते १५ जूननंतर राज्याच्या बहुतांश भागात मॉन्सूनच्या सरींना सुरुवात होते. या वर्षी मध्य महाराष्ट्र, विदर्भात पूर्व मोसमी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे जूनच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये राज्यात ४४.९ मिलिमीटर म्हणजे सरासरीच्या तुलनेत १२४ टक्के जास्त पाऊस पडला.

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) राज्यातील घोडदौड सोमवारीही कायम राहीली. पुढील दोन दिवसांमध्ये राज्याच्या उर्वरित भागात मॉन्सून सलामी देईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. राज्यात गेल्या दहा दिवसांमध्ये ४४.९ मिलिमीटर पाऊस पडला आहे. सरासरीच्या तुलनेत १२४ टक्के जास्त पाऊस पडल्याची माहितीही खात्यातर्फे देण्यात आली.

मॉन्सून सरासरी तारखांप्रमाणे १५ जूनपर्यंत संपूर्ण राज्य व्यापतो. या वर्षी आतापर्यंत अर्धा महाराष्ट्र व्यापला आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये म्हणजे एक ते दोन दिवस आधीच राज्यात सर्वदूर मॉन्सून हजेरी लावेल, असा अंदाज आहे. यंदा मॉन्सूनचा प्रवास अधिक वेगाने होत असल्याचे चित्र आहे. मॉन्सून गुरुवारी (ता. ६) चार दिवस अगोदर महाराष्ट्रात डेरेदाखल झाला. शनिवारी (ता. ८) पुणे, धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यांच्या काही भागातदेखील मॉन्सून पोहोचला होता. रविवारी (ता. ९) मॉन्सूनने मुंबईसह, ठाणे, पुणे, अहमदनगर, बीड जिल्ह्यांच्या बऱ्याचशा भागांत प्रगती केली. सोमवारी (ता. १०) डहाणू, नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत मजल मारली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivdeep Lande contest Bihar Election: ‘सिंघम’ शिवदीप लांडे यांचीही आता बिहारच्या निवडणूक रिंगणात उडी; उमेदवारी अर्ज दाखल करणार!

EPFO New Option : 'ईपीएफओ' सदस्यांना मिळाला नवा पर्याय! आता 'PF' रक्कम पेन्शन खात्यात वळवता येणार

ब्रेकिंग! साहेबांच्या नावाने लाच मागणारा एजंट ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; मयताच्या भावाकडे, पत्नीकडे पीएफ, पेन्शन काढून देण्यासाठी मागितले २५००० रुपये

Ajit Pawar : जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करण्याचे उपमुख्यमंत्री पवार यांचे आदेश

Supreme Court : मृत्युदंडाच्या पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्रावर नाराजी

SCROLL FOR NEXT