weather update Heavy Rain Orange Alert maharashtra six districts today 
महाराष्ट्र बातम्या

Rain Alert: पुढील तीन दिवस अतिमुसळधार; सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

राज्यात पुढील तीन दिवस अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

धनश्री ओतारी

राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील तीन दिवस अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. (weather update Heavy Rain Orange Alert maharashtra six districts today)

ठाणे आणि पालघर जिल्ह्यासह रायगड, रत्नागिरी, नाशिक आणि पुण्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासोबतच मुंबईसह सात जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.Weather Updates

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सक्रिय मान्सूनच्या स्थितीमुळे पुढील दोन ते तीन दिवसांत कोकणातील काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्राच्या लगतच्या घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.Weather Updates

कोकणातील बहुतांश भाग आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे. काल उत्तर कोकणच्या काही भागांत निर्जन ठिकाणीही अतिवृष्टी झाली.

रायगड, पालघर आणि पुणे येथे ३० जून रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई, ठाणे, रत्नागिरी, नाशिक आणि सातारा येथे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.Weather Updates

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज मुंबई आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस होणार आहे.मुंबईत सकाळपासूनच जोरदार पाऊस पडत आहे.

अंधेरीत देखील मागील अर्धा तासापासून जोरदार पाऊस कोसळत असून त्यामुळे सकल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या सभेमध्ये देखील पाणी साचले असून चार फुटापर्यंत पाणी साचल्यामुळे अंधेरी सर्वे मधून वाहनांना जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

मुंबई वाहतूक पोलिसांनी या ठिकाणी उभे राहून अंधेरी पश्चिमेची एस वी रोड वरून सरळ वाहतूक सुरू केली आहे तर पूर्वेकडील वाहनांना पश्चिम द्रुतगती महामार्गावरून जाण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस मध्य प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विभागाने आज पन्ना, दमोह, सागर, टिकमगड, छतरपूर, निवारी, मंदसौर, नीमच, गुना, अशोकनगर, शिवपुरी, राजगढ येथे अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. यासाठी विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. Weather Updates

उमरिया, कटनी, जबलपूर, नरसिंगपूर, सिवनी, बालाघाट, श्योपूर, भिंड, मुरैना, ग्वाल्हेर, दतिया, शाहजहांपूर, आगर, उज्जैन, रतलाम, झाबुआ, अलीराजपूर बरवानी, भोपाळ आणि विदिशा येथेही आज मुसळधार पावसाची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission : ‘’राजकीय पक्षांनी वेळीच आक्षेप नोंदवले नाहीत, जर असे घडले असते तर.. ‘' ; निवडणूक आयोगाने स्पष्टचं सांगितल!

Dahi Handi Festival : सरीवर सर! थरावर थर!! राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष

INDIA Alliance News : 'मतचोरीच्या' विरोधात 'I.N.D.I.A' आघाडीचा 'मतदार हक्क यात्रा'द्वारे बिहारमध्ये एल्गार!

हसत खेळत असलेली बाई अशी... पुर्णा आजीच्या जाण्याचा प्रेक्षकांनाही बसला धक्का; म्हणाले- मन मानायलाच तयार नाही की...

WhatsApp: एक व्हिडिओ कॉल अन् बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या कसा होतोय लेटेस्ट फ्रॉड

SCROLL FOR NEXT